महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळावा

महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळावा

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळावा २०२५ मध्ये गुरुवारी ६ मार्च रोजी रेशीमबाग मैदानातील प्रशिक्षण सभागृहामध्ये पिंक ई-रिक्षा व दिव्यांग ई-रिक्षा वाटप योजनेबाबत जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, महिला बाल विकास कार्यालय नागपूरच्या पूजा कांबळे, बँक व्यवस्थापक अल्का सिंग, प्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक स्नेहल पराझर, आकाश वालदे, तेजस देशमुख, अक्षय उपलकर यांची उपस्थिती होती. या सत्रामध्ये एकूण १८७ महिला व दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षा व दिव्यांग ई-रिक्षा योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना व चाइल्ड हेल्प लाईन क्रमांक, बँक कडून कर्ज उपलब्ध करुन घेण्याची प्रक्रिया, परिवहन विभागाकडून परवाना उपलब्ध करण्याची प्रक्रिया आदीबाबत माहिती देण्यात आली. ई-रिक्षा डिस्ट्रिब्यूटर राजेश स्टील बजेरीया मोटर्स, आशिष मार्केटिंग मु स्टोन, खालसा ई-रिक्षा यांच्या मार्फत या कार्यशाळेमध्ये ई-रिक्षा प्रत्यक्षिक देण्यात आले.महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळावा

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळावा २०२५ मध्ये गुरुवारी ६ मार्च रोजी रेशीमबाग मैदानातील प्रशिक्षण सभागृहामध्ये पिंक ई-रिक्षा व दिव्यांग ई-रिक्षा वाटप योजनेबाबत जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, महिला बाल विकास कार्यालय नागपूरच्या पूजा कांबळे, बँक व्यवस्थापक अल्का सिंग, प्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक स्नेहल पराझर, आकाश वालदे, तेजस देशमुख, अक्षय उपलकर यांची उपस्थिती होती. या सत्रामध्ये एकूण १८७ महिला व दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षा व दिव्यांग ई-रिक्षा योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना व चाइल्ड हेल्प लाईन क्रमांक, बँक कडून कर्ज उपलब्ध करुन घेण्याची प्रक्रिया, परिवहन विभागाकडून परवाना उपलब्ध करण्याची प्रक्रिया आदीबाबत माहिती देण्यात आली. ई-रिक्षा डिस्ट्रिब्यूटर राजेश स्टील बजेरीया मोटर्स, आशिष मार्केटिंग मु स्टोन, खालसा ई-रिक्षा यांच्या मार्फत या कार्यशाळेमध्ये ई-रिक्षा प्रत्यक्षिक देण्यात आले.