आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते वाशी (कोरा) येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

56

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते वाशी (कोरा) येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

 Inauguration of Kabaddi competition at Vashi (Kora) by MLA Sameerbhau Kunawar.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

वाशी कोरा:- भारतीय व देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे अभिनंदनीय व प्रशंसनीय बाब आहे या भारतीय खेळामधण देशाचे नाव लौकीक करण्याकरिता स्थानिक स्तरातून अशा स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्रिडापटू तयार होत असतात. अशा प्रकारच्या खेळा मधून खेळाडूंमध्ये संघभावना तर निर्माण होतेच परंतु दैनंदिन खेळ खेळल्यामुळे एक आरोग्य वाढवून आरोग्य संपन्न पिढी भविष्यामध्ये तयार होण्यास अशा प्रकारच्या क्रीडास्पर्धा हात भार लावत असतात. अशा प्रकारचे मनोगत मा. कार्यसम्राट समीरभाऊ कुणावार यांनी व्यक्त केले.

 Inauguration of Kabaddi competition at Vashi (Kora) by MLA Sameerbhau Kunawar.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महामंत्री मा. किशोर भाऊ दिघे, विशेष अतिथी म्हणून संजयजी देहणे, रोशन भाऊ चौके जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सौ. पुष्पांजलीताई नेवल, प स सदस्य वसंतभाऊ घुमडे, रमेश भाऊ भोयर, वासुदेवराव चौधरी, छत्रपती राऊत, प्रशांतभाऊ चाफले, धनपाल जी भगत, किशोर भाऊ साबळे,  कैलाशजी टिपले इत्यादी मान्यवर व असंख्य गावकरी मंडळी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.