राष्ट्रवादीनगर येथे बुद्ध जयंती थाटात साजरी

राष्ट्रवादीनगर येथे बुद्ध जयंती थाटात साजरी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 13 मे
बौद्ध समाज मंडळ राष्ट्रवादीनगर -तुळशीनगर चंद्रपूर येथे बुद्ध जयंती थाटात साजरी करण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष राकेश रामटेके, राहुल निमगडे आणि झाडे यांच्या हस्ते तीन ठिकाणी धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण – पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली.
बुद्ध पौर्णिमा या मंगल दिनाचं औचित्य साधून धम्मकीर्ती बुद्ध विहार , राष्ट्रवादीनगर येथील वॉल कंपाऊंड बांधकाम भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला .
किशोर जोरगेवार आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या शुभ हस्ते ” भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रसंगी सुभाष कासनगट्टूवार माजी नगरसेवक मनपा
प्रकाश देवतळे भाजपा नेते, राकेश रामटेके, देवतळू कुसुमताई उदार, अविनाश राखुंडे, पुरुषोत्तम राऊत आदींची उपस्थिती होती.
बौद्ध समाज मंडळ च्या वतीने आ .किशोर जोरगेवार आणि सुभाष कासनगट्टूवार तसेच प्रकाश देवतळे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तथा विचार मंचावर विराजित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .
याप्रसंगी सुभाष कासनगोट्टूवार यांनी तथागत गौतम बुद्धाच्या मार्गावर आपण वाटचाल करत, त्यांनी दिलेली शिकवण अंगिकारली तर मानवाचे कल्याण होऊ शकते असे मौलिक विचार मांडले. त्यानंतर आ.किशोर जोरगेवार आमदार,यांनी धम्म उपासक उपासिका यांना तथागत गौतम बुद्धाच्या करुणा,मैत्री , प्रेम ,शांती , स्वातंत्र्य , बंधुता , शील यावर सखोल मार्गदर्शन करून बुद्ध पौर्णिमा च्या दिवसाचे महत्व समजावून सांगितले .
कार्यक्रमाचे संचालन ठेमस्कर यांनी केले तर देवगडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खीर व मसाला भात चे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाला सर्व धम्म उपासक व उपासिका बहुसंख्येनी उपस्थित होते.