‘एप्रिल मे 99′ – बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा सिनेमा 16 मे रोजी प्रदर्शित
✍️सचिन सतीश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞
दिघी- दिनांक १६ मे रोजी लेखक-दिग्दर्शक अमोल मारुती रेडीज यांचा मराठी सिनेविश्वात एक नवा, भावनिक आणि नॉस्टॅल्जिक सिनेमा “एप्रिल मे 99” प्रदर्शित होतोय.लेखक-दिग्दर्शक-सिनेनाट्यअभिनेते अमोल मारुती रेडीज यांनी एक खास आवाहन करत प्रेक्षकांना हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचं आवाहन केलं आहे.
“एप्रिल मे 99” या चित्रपटाचं दिग्दर्शन कास्टिंग क्षेत्रात यशस्वी कामगिरी केलेल्या रोहन मापुस्कर यांनी प्रथमच केलं आहे. त्यांच्या या पहिल्याच सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा दिग्दर्शक उगम पावतो आहे. या चित्रपटाची निर्मिती श्रीवर्धन ची शान राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी केली आहे. कोकणातील अप्रतिम निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य अनुभवायला मिळणार आहे. 1999 च्या एप्रिल-मे महिन्यांतील सुट्ट्यांची धमाल – बालपणीच्या गोड आठवणी पुन्हा जिवंत होणार आहेत. भावनिक नातेसंबंधांवर अधारित कथानक तसेच उत्कृष्ट संगीत आणि भावस्पर्शी गाणी व स्मार्टफोन पूर्व काळातील मासूम उद्योगांची आठवण करून देणारा हा चित्रपट लोकांना आवडेल या शंकाच नाही कारण याचे परफेक्ट कास्टिंग व पात्रं अगदी जिवंत वाटणारी आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील आठवणी, प्रेमकथा आणि मित्रांची मैत्री यांचा हळवा स्पर्श या चित्रपटात पाहायला मिळेल गेट-टुगेदर करणाऱ्या मित्रमंडळींसाठी तर ही खास भेट आहे. या चित्रपटातून एक सामाजिक आणि भावनिक संदेश असा दिला आहे की “एप्रिल मे 99” हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर आपल्या लहानपणाच्या आठवणी जपण्यासाठी आणि नव्या पिढीला त्या काळाची झलक दाखवण्यासाठी एक सुंदर संधी आहे.
अमोल रेडीज यांनी स्पष्ट केलं आहे की, चांगला दर्जा असलेला सिनेमा जर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिला तर मराठी चित्रपटसृष्टीला नवी ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे त्यांनी सर्व प्रेक्षकांना, मित्रमंडळींना नातेवाईकांना आणि समाजबांधवांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.