Home latest News रायगड मधील ६ हजार जलस्त्रोताचे सर्वेक्षण

रायगड मधील ६ हजार जलस्त्रोताचे सर्वेक्षण

106

रायगड मधील ६ हजार जलस्त्रोताचे सर्वेक्षण

८०१ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड; ११ पिवळे, जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड नाही

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागातील पाण्याचे स्तोत्र मोठ्या प्रमाणात दूषित होतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होतो. पण साथीचे आजार पसरु नयेत, यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्तोत्रांचे स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा करण्यात येते. या सर्वेक्षणामध्ये मागील तीन वर्षात जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतला रेड कार्ड देण्यात आलेला नाही. रायगड जिल्ह्यातील ८१२ ग्रामपंचायतीमधील ६ हजार ८९ तर जलस्त्रोता चे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ८०१ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले असून,११ ग्रामपंचायतला पिवळे तर एकाही ग्रामपंचायत ला रेड कार्ड दिलेले नाही.

पिण्याच्या पाण्यामुळे कावीळ, कॉलरा, अतिसार, टायफाईड, अमेबियासिस, गॅस्ट्रो,खरुज व अन्य आजार पसरतात. त्यासाठी ग्रामपंचायती कडून जल स्तोत्रांचे सर्वेक्षण करून ते दूषित होऊ नयेत म्हणून पाणी शुद्धीकरण केले जाते. त्यासाठी जलस्रोताचे सर्वेक्षण हे एप्रिलमध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात येते. पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी प्रत्येक गावात जलशुद्धीकरण केले जाते. कावीळ, कॉलरा,अतिसार, टायफाईड व इतर आजार दूषित पाण्यातून होतात.

रायगड जिल्ह्यात शासनामार्फत पाणीपुरवठ्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या योजना लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे.

रेड कार्ड – ग्रामपंचायत मधील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्तोत्रावर अवलंबून ग्रामपंचायतिला देण्यात येते.

पिवळे कार्ड – कार्ड देताना गावातील प्रत्येक स्तोत्राची जोखीम नमूद करतात. ग्रामपंचायत मध्ये ते५०% ,५०% पेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्तोत्रावर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायती पिवळे कार्ड दिले जाते.

हिरवे कार्ड- ग्रामपंचायत मधील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्तोत्रावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड देण्यात येते.

पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आपण वेळच्यावेळी करत आहोत. ग्रामपंचायतीना लागणाऱ्या औषधाचा साठा उपलब्ध करण्यात येतो. त्यामुळे आपल्याकडे एकही ग्रामपंचायतला रेड कार्ड नाही.
संजय वेंगुलेकर कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद रायगड