Home latest News पिप्रेड मीटर विरोधात खारेपटातील ग्रामस्थांची महावितरणवर धडक

पिप्रेड मीटर विरोधात खारेपटातील ग्रामस्थांची महावितरणवर धडक

203

पिप्रेड मीटर विरोधात खारेपटातील ग्रामस्थांची महावितरणवर धडक

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-म.रा.वि.मंडळ मार्फत बसवण्यात येणाऱ्या घरगुती प्रीपेड मीटरला खारेपाटातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून ते काम थांबविण्या बाबत ग्रामस्थानी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मार्फत जिनस कंपनी मर्यादित निर्मित अदानी यांच्या ठेकेदार च्या वतीने घरगुती पिप्रेड मीटर बसवण्यात येत आहेत. यास विरोध करण्या साठी खारेपाठ विभागातील ग्रामस्थांनी आज महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.
या वेळी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे उप कार्यकारी अभियंता कमलाकार अंबाडे यांना भुवनेश्वर १८ गाव समिती , ग्रामपंचायत वाघ्रण, सेवाश्रम सामाजिक विकास संस्था यांच्या वत्तीने निवेदन देण्यात आले.
व हे मीटर बसवताना संबंधित कर्मचारी ग्रामपंचायतची, घर मालकाची कोणतीही पूर्व सूचना किंवा परवानगी घेतली जात नाही.या पूर्वी बसविलेले इलेक्ट्रॉनिक मीटर योग्य पद्धतीने कार्यरत असून सुद्धा आता हे नवीन प्रीपेड मीटर कशाला असा प्रश्न ही ग्रामस्थानी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. आम्हाला हे नवीन मीटर नको असून त्याला
खारेपाटातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. व मीटर बसविण्याचे काम त्वरीत थांबविण्यात यावे. अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वत्तीने करण्यात आली.जर हे पिप्रेड मीटर बसवण्याचे काम थांबवण्यात न आल्यास १८ गावातून तीव्र आंदोलनात करण्यात येईल अशी सूचनाही देण्यात आली.

या वेळी मानव अधिकार संरक्षण समिती,चे रायगड ज़िल्हा जनसंपर्क अधिकारी कृष्णकांत पाटील, भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट 18 गाव समिती चे पदाधिकारी, वाघ्रण ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पाटील, दीपक पाटील, दयानंद म्हात्रे, नरेंद्र पाटील, घनश्याम पाटील, रामकृष्णा पाटील, धनंजय मोकळ,
आदी उपस्थित होते.