महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले..
भिवंडी मनपाच्या प्रभाग रचनेचे कामकाजाला सुरवात.

अभिजीत आर. सकपाळ
भिवंडी प्रतिनिधी
9960096076

भिवंडी :- विधानसभा निवडणुकी नंतर प्रतीक्षेत असलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या हालचालीला राज्याच्या प्रशासकीय पातळीवरून सुरुवात झाली असून “ड ” वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्या बाबतचे आदेश-२०२५ भिवंडी महानगरपालिकेस आज (११जुलै) रोजी मिळाले आहेत. त्यानुसार पालिकेच्या निवडणुक कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली असून शासन निर्देशानुसार भिवंडी महानगरपालिकेच्या नवीन 45 प्रभाग रचनेकडे राजकीय पक्षांचे पुढारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी महानगर पालिका ही “ड ” वर्ग महानगरपालिका असून सन २०११ साली केलेल्या शहराच्या जनगणने नुसार मनपा क्षेत्राच्या हद्दीतील
नागरिकांची लोकसंख्या सुमारे ७ लाख ९ हजारापेक्षा जास्त आहे. मात्र गेल्या १४ वर्षात शहरात झालेल्या विकासानुसार येथील लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांना अपेक्षित मूलभूत सुविधा मिळत नाही. तर स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी गेल्या