Home latest News डॉ. मनीषा विखे यांची खातीनीहाय चौकशी होणार

डॉ. मनीषा विखे यांची खातीनीहाय चौकशी होणार

74

अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी, आमदार महेंद्र दळवी यांनी केली बदलीची मागणी 

रत्नाकर पाटील, रायगड ब्यूरो चीफ 

मो: ९४२०३२५९९३

अलिबाग:- ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी पदी बदली होऊन देखील पुन्हा रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी आग्रही असलेल्या डॉ. मनीषा विखे यांच्या बद्दल जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. शिवाय स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी देखील डॉ.विखे यांच्या कामकाजाबाबत तक्रार केली आहे. या प्रकरणी येत्या 19 जून रोजी चौकशी करणार केली जाणार आहे.

डॉ.मनीषा विखे या रायगड जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नुकताच त्यांची प्रशासकीय बदली होऊन त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. डॉ. मनीषा विखे यांना ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली असून डॉ. सूर्यवंशी यांची रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान आपल्या बदली विरोधात डॉ. विखे यांनी मॅटमध्ये धाव घेतली असल्याचे वृत्त आहे.

असे असले तरी डॉक्टर विखे यांच्या विरोधात रायगड जिल्हा परिषदेतील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून ठाणे येथील कुष्ठरोग विभागाचे आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. मनीष रेघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विखे यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करून अभिप्राय अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालक ठाणे यांनी दिले आहेत. अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात 19 जून रोजी सकाळी 11 वाजता ही चौकशी सुरू होणार असून सर्व संबंधित तक्रारदार तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

 अधिकारी कर्मचारी यांचे पगार वेळेवर न करणे ,कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या फाइल्स रोखून धरणे, बदली झालेल्या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त न करणे,अधिकारी ,कामात हलगर्जीपणा, जबाबदारी ढकलले अशा प्रकारच्या तक्रारी डॉ. विखे यांच्या विरोधात आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनीही डॉ. मनीषा विखे यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करीत या संदर्भातील तक्रारी केल्या आहेत. डॉ. मनीषा विखे यांच्या बदलीची मागणी ही आमदार महेंद्र दळवी यांनी केली होती.