मंथन राज्यस्थीरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025
गुण गौरव सोहळा सपन्न
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत :- मंथन वेलफेयर फाउंडेशन अहिल्यानगर यांच्या वतिने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, मुबई शहर व उपनगर येथील गुणवत्ता धारक राज्यस्थीरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025
घेण्यात आली होती. रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी कर्जत शेळके हॉल येथे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या प्रमुख उपस्तितीत विद्यार्थीचा गौरव करण्यात आला.
यावेळी सलोनी बिडवे राज्यात पहिली, तनुज शेळके राज्यात तिसरा, मनस्वी ढवळे व श्रुतिका तांबे हाय राज्यात चौथ्या क्रमाक मिळवलं आहे.
महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेली एकमेव शालेय स्पर्धा परीक्षा म्हणजे मंथन आहे. मंथन वेल्फेअर फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते.
या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी किंवा प्रशासकीय अधिकारी व्हायचं असेल तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं खूप गरजेचं आहे.
त्यासाठी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची माहिती व तयारी करता यावी या उद्देशाने गेल्या दोन वर्षापासून कर्जत मध्ये भारत बिडवे गुरूजी हे
सेवानिवृत्त शिक्षक हे मंथन राज्यास्थरीय स्पर्धा परीक्षा चे आयोजित करत आहेत. यावर्षी परीक्षेमध्ये १२०४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यापैकी 764 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमधून सहभागी झाले. राज्यस्तरावर व विभाग स्तरावर कर्जत तालुक्यातील एकूण 12 विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवला आहे
त्यापैकी 7 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. सदर परीक्षेचा एकूण निकाल 64% लागला आहे
स्पर्धा परीक्षेची आवड लागावी व इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरचा निकाल वाढवा यासाठी मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा खूप उपयुक्त आहे.
ज़िल्हा परिषद शाळेत मी ही शिकलो आहे.. कष्टवार विश्वास ठेवा, कष्ट करायला शिका तरच आपले विद्यार्थी पुढे येणार आहेत पालकांनी लक्ष द्यावे.
असे प्रांत अधिकारी संकपाळ यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रसाद थोरवे (शिवसेना),प्रकाश संकपाळ प्रांत अधिकारी कर्जत, भारत बिवडे गुरुजी,
सुनील भोपळे – उपशिक्षण अधिकारी रा.जी.प. सुशांत पाटील गटविकास अधिकारी कर्जत, शिवाजी ढवळे सहायक पोलीस निरीक्षक नेरळ, अनंत खैरे गटशिक्षणाधिकारी कर्जत आदि मान्यवर उपस्तीत होते.