सदस्य संघटन पर्वाच्या माध्यमातून संजय कौडगे यांनी भाजपाची ताकद वाढवली,
कणखर नेतृत्व शैलीमुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विधानसभेत पक्षाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला
नांदेड जिल्हा प्रतिनिधी /अभिषेक बकेवाड
नांदेड – महाराष्ट्रात महायुतीला भरघोस असे यश मिळाल्यानंतर अनेक जण श्रेयवादाच्या तयारीत आहेत पण पक्षाला अडचणीच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वाच्या माध्यमातून पक्ष वाढीबरोबर संघटन वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करून मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघात रात्रंदिवस प्रवास करून त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल या उद्देशाने काम करणारे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे यांनी भाजपा व संघाच्या माध्यमातून भाजपाच्या 46 मतदारसंघा पैकी 20 मतदारसंघात भाजपाचा उमेदवार होता त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी रणनीती आखून तेथील उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाची पराकाष्टा केली तेव्हा 46 पैकी 29 जागेवर महायुतीने तर 19 जागेवर भाजपाने यश संपादन केले या सर्व बाबीला मराठवाड्यातील भाजपा वाढीचे मास्टर स्ट्रोक म्हणून संजयजी कौडगे यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या कणखर नेतृत्व शैलीमुळे त्यांनी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आणत त्या मतदारसंघात त्यांनी नेत्रदीपक संघटन मजबूत केले या सर्व विजयाचे खरे शिलेदार संजयजी कौडगे ठरले आहेत त्यामुळे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मा.ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन सुद्धा केले पण या सर्व यशानंतर पक्षांमध्ये सध्या श्रेयवाद मोठ्या प्रमाणात उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे बऱ्याच कार्यकर्त्यांचे पक्षासाठी कुठेही योगदान नसल्याचे दिसून येते पण आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते असल्याचा कांगावा करून ते विरोधकांच्या मांडीला मांडी लावून भाजपा पक्षातील संघटनमंत्र्याला विरोध करण्याचे काम करत असल्याचे सध्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे हे सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यावर पक्षश्रेष्ठींनी योग्य विचार करण्याची गरज आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस मतांच्या चर्चेबरोबरच पक्षात ज्या कार्यकर्त्यांचे अस्तित्व नाही अशा कार्यकर्त्यांकडून पक्षातील संघटनात्मक संघटन मंत्र्यांबरोबर असंख्य मंडळ अध्यक्ष यांच्यावर विरोधकांच्या सांगण्यावरून आरोप प्रत्यारोप करण्याचे केविलवाणी प्रयत्न सध्या भारतीय जनता पार्टीत सुरू आहेत ह्याची नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी बारकाईने सूक्ष्म निरीक्षण करून जे कुणी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विरोध करत असतील त्यांचे पक्षासाठी किती महत्त्व आहे ह्याची जाणीव ठेवून पक्षासाठी काम करणारे मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कौडगे सह इतर पदाधिकाऱ्यावर होत असलेले आरोप खोडून काढावे व प्रथम राष्ट्र, नंतर देश, माझा पक्ष व नंतर माझा परिवार या तत्त्वावर काम करणाऱ्या सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लोकसभेच्या पराजयानंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाची पराकाष्टा करून मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघात पायाला भिंगरी लावून भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या संघटन पर्वा मध्ये दिवस-रात्र काम करून मागील विधानसभेत 20 पैकी 19 जागेवर भारतीय जनता पार्टीला नेत्र दीपक यश मिळवून दिले अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांनी राहून त्यांना आगामी काळात अजून भाजपा वाढीसाठी बळ देण्याचे काम पक्षश्रेष्ठींनी करावे असे असंख्य मंडळाध्यक्षंकडून बोलल्या जात आहे.
मागील काळात भारतीय जनता पार्टीने जे सदस्य नोंदणी अभियान राबविलेल्या सदस्य नोंदणी अभियानाचा फायदा आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार असल्याचे दिसून येत असल्याचा मुळे विरोधकांचे लोंढेच्या लोंढे पक्षात येण्यासाठी सर्वत्र धडपड करताना दिसून येत आहे मागील काळात झालेले सदस्य नोंदणी अभियान आगामी काळात भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यात नवी उभारी मिळून देणार असल्याचे सध्या राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे
खंबीर संघटनमंत्र्याच्या नेतृत्वामुळे भाजप मराठवाड्यात अव्वल, महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण….
भाजपाची सदस्य नोंदणी महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे त्यामध्ये मराठवाड्याचे संघटन मंत्री संजयजी कौडगे यांनी मराठवाडा विभाग अव्वल ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपाची एक मोठी ताकद मराठवाड्यात निर्माण केली आहे नुकतेच विधानसभेमध्ये मिळालेल्या यशात हे दिसून पण आले भाजपा ने मराठवाड्यात महायुतीच्या 46 जागा लढविल्या त्यात 20 जागेवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांपैकी 19 उमेदवार हे भरघोष मताने निवडून आल्यामुळे मराठवाडा विभाग हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे संघटन मंत्रीच्या सूक्ष्म नियोजनावर मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे यांनी काम केले व आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा भरघोष यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बूथ सदस्य ते मंडल अध्यक्षाकडून पक्षाचे पारदर्शक काम करून घेत आहेत त्यामुळे विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सूरू आहे…
पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवणारा संघटन मंत्री…
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन प्रदेश अध्यक्ष मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण , नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अतुलजी सावे ,महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री आमदार विक्रांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, खा.गोपछडे , सोशल मीडिया प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी गाडे यांच्यासह मराठवाड्यातील असंख्य भाजपा नेत्यांचा विश्वास संपादित करून पक्षाची धुरा पारदर्शक पने सांभाळणारे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे अशी यांची ओळख..