Home latest News रायगड मध्ये आरक्षण सोडतीनंतर मोर्चे बांधणी सुरू

रायगड मध्ये आरक्षण सोडतीनंतर मोर्चे बांधणी सुरू

83

रायगड मध्ये आरक्षण सोडतीनंतर मोर्चे बांधणी सुरू

पावसाळ्यानंतर निवडणुकांचे बिगुल वाजणार

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल पावसाळ्यानंतर वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर येणाऱ्या हरकती विचारात घेऊन ही प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचे ५९गट असून, ११८ गण आहेत. पनवेल महापालिका झाल्यामुळे पूर्वी ६२असलेली गट संख्या ५९ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ८१० ग्रामपंचायती असून, २४०निवडणुकांमध्ये रणधुमाळी उडणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
ग्रामविकास विभागाने १२ जून२०२५ च्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समित्यांची प्रभाग रचना २०११च्या जनगणनेनुसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५तालुक्यातील एकूण लोकसंख्या १७ लाख ९७,४०१इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ७३ हजार ५९ इतकी असून, अनुचित जमातीची दोन लाख ७४ हजार ९७४ इतकी आहे. त्यानुसार गट आणि गण पडले आहेत.
*महिलांच्या हत्ती ४२ ग्रामपंचायतीचा कारभार*

जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद फलकावर, सर्व तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध केले आहेत. कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास संबंधित तहसीलदार यांच्याकडे २१ जुलैपर्यंत सादर कराव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
-किशन जावळे, जिल्हाधिकारी

*तालुकानिहाय आढावा*
अलिबाग तालुक्यामध्ये २लाख१५ हजार ४२४ मतदारा असून ७ गट व १४गण,मुरुड ६१हजार ९९१ मतदार असून २ गट ४गण ,पेण १लाख५७ हजार ६०२मतदार असून ५ गट १०गण ,पनवेल २लाख ४०हजार ३३५ मतदार असून ८गट १६ गण,उरण १लाख ३१ हजार ६८३ मतदार असून ४गट ८गण, कर्ज त १ लाख ७७ हजार ९९५मतदार असून ६ गट १२गण ,खालापूर १ लाख २९हजार ९०२ मतदार असून ४गट ८ गण,रोहा १लाख ४६हजार २६१ मतदार असून ४गट ८ गट, सुधागड ५१ हजार ८३१ मतदार असून २गट ४ गण ,माणगाव १लाख ४० हजार ८७३मतदार असून ४ गट ८गण, तळा ३३ हजार ६३८मतदार असून २ गट ४ गण ,महाड १ लाख ५२ हजार ६५५ मतदार असून ५गट १० गण ,पोलादपूर ३९ हजार ५२० मतदार असून २ गट ४गण,श्रीवर्धन ६७ हजार ९०४ मतदार असून २ गट ४ गण , म्हसळा ४६ हजार ७८७ मतदार असून २ गट व ४गण असे एकूण रायगड जिल्ह्यात ५९ गट असून ११८ गण आहेत.