ज्येष्ठ नागरिक संघटना परहूरपाडा तर्फे वृक्षारोपण
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक संघटना तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शैक्षणिक उपक्रम म्हणून दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गावातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघटना, परहूरपाडा तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज गावातील मैदान सभोवताली वृक्षारोपण करण्यात आले. वातावरणातील बदल हे आपल्याला दिवसेंदिवस जाणवत आहे. यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. असे संघटनेचे अध्यक्ष, जे. पी. घरत यांनी सांगितले . वृक्षारोपण करून ज्येष्ठ नागरिक संघटनेने तरुण पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.