Home latest News शेकापचा वर्धापन दिन पनवेल येथे होणार

शेकापचा वर्धापन दिन पनवेल येथे होणार

107

शेकापचा वर्धापन दिन पनवेल येथे होणार

राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवारी (दि.02) सकाळी दहा वाजता, नवीन पनवेल येथे पक्ष सदस्यांचा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे. शेकाप सरचिटणी जंयत पाटील यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्याची तयारी झाली आहे. गावोगावी, शहरी भागात ठिकठिकाणी कार्याकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत.या बैठकांमधून कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकापचा वर्धापन दिन तथा मेळावा हा कार्यकर्त्यांना उमेद देणारा आहे. त्यामुळे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्यादेखील प्रचंड असणार आहे. या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य खजिनदार अतूल म्हात्रे, शेकाप सोशल मिडीया प्रमूख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप सहचिटणीस ॲड. गौतम पाटील आदी दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी जोरात सुरु केली आहे. महिला, तरुण, युवक, ज्येष्ठ अशा सर्वच कार्यकर्त्यांना हा मेळावा एक वेगळी शक्ती, उमेद देणारा असणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. या मेळाव्यातून मिळालेली विचारांची शिदोरी घेऊन कार्यकर्ता एक वेगळ्या उमेदीने निवडणूकांसाठी कामाला लागणार आहे. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे.