अमरावती चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या.

59

अमरावती चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या.

Amravati: A tribal woman was gang-raped and killed after drinking alcohol for four days.

अमरावती:- आज देशात महीला अत्याचार आणी हत्येचे ऊत आल्याचे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे माघील अनेक घटने वरुन दिसून येत आहे. अमरावती जिल्हात एक आदिवासी समाजाचा महीलेवर बलात्कार करुन हत्या झाल्याने संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

अमरावती जिल्ह्यात आदिवासी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. शिरखेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निलेश मेश्राम, विनोद तुकाराम वानखडे, सुधीर रघुपती वानखडे, असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत.

अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याअंतर्गत तळेगाव येथे 5 फेब्रुवारीला एका आदिवासी महिलेवर बलात्कार करुन तिच्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिरखेड पोलिसांनी जवळच्या विष्णोरा रहिवासी निलेश मेश्रामला अटक करण्यात आली होती.

आरोपी मेश्रामने पोलिसांना हत्येमध्ये सहभागी असल्याचे सांगितले होते. मात्र, क्राईम ब्रांचच्या जबाबात आरोपीने सांगितले की, मृत महिलेची हत्या तळेगाव येथील सुधीर रघुपती वानखडे वय 26 तसेच विनोद तुकाराम वानखडे वय 40 यांनी केली. जर मेश्रामने पोलिसांसमोर तोंड उघडल्यास त्याचीही हत्या करु, अशी धमकीही त्यांनी दिल्याने मोश्रामने खून केल्याची खोटी कबुली दिली, असे मेश्रामने पोलिसांना सांगितले होते.

शिरखेड पोलिसांनी आरोपी मेश्राम याच्या कबुली जबाबाला गंभीर घेत क्राईम ब्रांचच्या मदतीने दोन्ही आरोपींवर सीडीआर कॉलिंग आधारानुसार भांदविचे कलम 302, 376, 201 नुसार गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली. या गुन्ह्याची कबुली देताना त्यांनी सांगितले की, दिनांक 1 फेब्रुवारीपासून मृत महिलेला रिद्धपूर निवासी एका प्रतिष्ठित सरकारी कॉन्ट्रॅक्टरच्या विटांच्या भट्ट्यावरुन उचलले होते. चार दिवस या दोन्ही आरोपींनी तिला दारु पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मात्र, महिलेने पोलिसांत जाऊन तक्रार करण्याची धमकी दिली. पोलिसांपासून बचावकरिता तिची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.