मधूमेह मुक्ती सहज साध्य – डॉ. भाग्येश कुलकर्णी
कमळ नागरी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन; तणावविरहीत जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४३०३२५९९३
अलिबाग:- व्ययामाची सवय, जेवणातील सातत्य आणि मानसिक तणावविरहीत जीवनशैलीच्या अंगीकारणाने मधुमेहापासून हमखास मुक्तता मिळते. असे मार्गदर्शन पुणे येथील रिव्हर्सल स्पेशलिस्ट तथा ‘डायबेटीस फ्री फॉरेएव्हर’ चे संचालक डॉ. भाग्येश कुलकर्णी कमळ पतसंस्थेच्या सहकार्याने आयोजित ‘मधुमेह मुक्त जीवन कसे ते जाणून घेऊ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळेला संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके यांच्या प्रयत्नाने व सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करणे सोपे झाले. त्याचबरोबर संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी डॉ. संजीव शेटकर, डॉ. अमेय केळकर, श्री. विलास म्हात्रे, डॉ. अरविंद केळकर, डॉ. अपुर्वा कुमठेकर व डॉ. अवनी केळकर यांचा सन्मान पत्र देऊन कमळ पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कायम निरोगी राहताना दीर्घकालीन आरोग्य आणि मधुमेहापासून मुक्तता कशी करायची हे डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना आयबीएन लोकमत व महाराष्ट्र टाईम यांच्यातर्फे पुरस्कार मिळालेले आहे. यावेळी मार्गदर्शनात त्यांनी सांगितले, कार्बोहायड्रेट हा सर्वात महत्त्वाचा घटक डायबिटीसचे प्रमाण वाढण्याचे आहे व शरीरात एनर्जी ही खूप महत्त्वाचा घटक आहे. मधुमेह वाढीसाठी दोन गोष्टी या कारणीभूत ठरत आहेत. यातील एक चरबी वाढणे व जीवनामध्ये तणाव. मधुमेह सुरुवातीला तपासणीसाठी ग्लुकोज टॉलरन्स ही टेस्ट ही महत्त्वाचा असते व ती केल्यावर शुगर दीडशेच्या आत येणे हे गरजेचे असते व शुगर वाढण्याचे कारण कार्बोहायड्रेट सांगितले. त्यात कोणते पदार्थ असतात दूध युक्त चहा-कॉफी, नाश्ता पोहे-उपमा जेवण जास्त प्रमाणापेक्षा जास्त केल्यावर कार्बोहायड्रेट वाढतात. तसेच जेवण ७० पेक्षा जास्त प्रमाण गेल्यावर शुगरचे प्रमाण वाढते, स्टार्च हा ग्लुकोजचा एक भाग असतो. डायबेटिसमध्ये तो महत्त्वाचा घटक समजला जातो. कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे त्यामुळे डायबेटिस आपोआप कमी होते व डायबिटीस कमी करण्यासाठी प्रोटीन व्हिटॅमिन वाढवणे हे गरजेचे आहे. डायबिटीस मुक्त करण्यासाठी शरीरामध्ये छोटे छोटे बदल करणे हे महत्त्वाचे आहे, अमेरिकन डायबेटीस असोसिएशन तर्फे एचबीए१सी सात ते आठच्या आत असेल तर नो मेडिसिन हे अमेरिकेमध्ये धोरण राबवण्यात आले आहे. त्यांना व्ययाम व डायट यानुसार ती कमी करण्यात सल्ला देतात. रोज ४५ मिनिटे व्यायाम, सूर्यनमस्कार व शरीरामधून घाम आला पाहिजे, त्यामुळे आपल्या डायबिटीस कमी होण्यास मदत होते. व्ययामानंतर एक दीड तास काही न खाणे व मोड आलेले कडधान्य ज्यूस व वेळेवर झोपणे व तणाव मुक्त जीवन जगले पाहिजे तरच आपले शुगर ही कमी होण्यास मदत होते. जीवनामध्ये दुसऱ्याला आनंद देणे दुसऱ्याविषयी कृतज्ञ व्यक्त करणे मेडिटेशन करणे व महत्त्वाचे म्हणजे आपले मन शांत ठेवणे माणसाशी समाजामध्ये गोड बोलणे व कृतज्ञतेचे ओझे उतरवणे, यामुळे डायबेटिस मुक्त होण्यास मदत होते व दीर्घ आयुष्य व सुख आयुष्य हे जीवनात महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपले रक्त थंड असणे हे सर्वात महत्त्वाचा घटक शुगर कमी करण्यात ठरतो. आपले शरीर जलतत्त्वानुसार बनलेले आहे व त्यामुळे ते स्थिर म्हणजे शांत ठेवले पाहिजे टाईप वन डायबेटीस कमी होत नाही, पण पुढच्या पिढीसाठी डायबिटीस मुक्त करण्यात आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. डायबेटिस मुक्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संयम दुसरा उत्तम डॉक्टर, म्हणजे आपल्याला चांगल्या सल्ला देणे कमी औषधे व कोणता आहार घेणे याचा सल्ला देणे हे महत्त्वाचे आहे व तिसरे महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाचे सहकार्य सर्वात महत्त्वाचा घटक हा डायबिटीस मुक्त करण्यासाठी आहे. अलिबागमध्ये डायबेटिस मुक्त केंद्र उभारण्याचा विचार आहे असे डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी सांगितले आहे. आतापर्यंत 16 हजार डायबिटीस मुक्त लोक केलेले आहेत.
यावेळी मनोगतात डॉ. अरविंद केळकर यांनी सांगितले की, एका कुटुंबात तीन पिढ्या नांदत असतात, प्रत्येक पिढीमध्ये जेवण, दळणवळण शारीरिक अंगमेहनतीची कामे व मानसीक ताणतणाव हे प्रचंढ वेगाने बदलत आहे. सद्याच्या पिढीमध्ये बैठी जीवनशैली, बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय व अतिरिक्त ताणतणाव व त्याचबरोबर वाढलेला राहणीमानाचा खर्च यामुळे तरुण वयात सुद्ध मधुमेही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. पुर्वी मधुमेह रुग्ण ५० किंवा ६० नंतर आढळयाचे; मात्र आता वयाच्या ३० नंतरही आढळून येतात. प्रॅक्टीस करत असताना दिवसेदिवस मधुमेह व स्थुलत्व वाढत चालले आहे. या करिता जनजागरणासाठी २४ नोव्हेंबर रोजी मधुमेह नियंत्रण व स्थुलत्व नियंत्रण मिलेट्सच्या सहाय्याने कसा साधला जातो, या बद्दलचा कार्यकम आयोजित केला होता. मात्र, नियंत्रणाचे पुढचं पाऊल मधुमेहमुक्ती कशी साधता येईल याबद्दल ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हरचे’ चे संस्थापक डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्याबरोबर बोलण्यानंतर कमळ पतसंस्थेबरोबर हा कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरले. मागच्या पिढीपर्यंत मधुमेह नियंत्रण हे केवळ उद्दिष्टे होते. परंतु सलग पाच वर्षाच्या सलग प्रयत्नांनंतर आपली मधुहेम मुक्ती होऊ शकते, हे डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी सहज समजावून सांगितले व त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कमळ पतसंस्थेने खूप मोलाचे योगदान दिले आहे. कार्यक्रम सर्वांग सुंदर होण्यासाठी कमळ पतसंस्थेचे श्री. दिलीप पाटील हे जून महिन्यापासून सातत्याने झटत होते. कार्यक्रमाची सांगत पसायदाने करण्यात आली व आभार प्रदर्शन दिलीप पाटील वरिष्ठ व्यवस्थापक यांनी केले व मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडला.









