स्वामी विवेकानंद मतिमंद शाळा नागभिड “रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा”

स्वामी विवेकानंद मतिमंद शाळा नागभिड
“रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा”

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909

नागभिड: स्थानिक लोककल्याण बहुद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी व्दारा संचालित ” स्वामी विवेकानंद मतिमंद शाळा” नागभिड येथे मोठ्या उत्साहात रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.
शाळेतील सर्व मुलांना तसेच कर्मचारी महोदयांना प्रथम ओवाळणी घालुन मुलींकडुन रक्षाबंधन बांधण्यात आले.
: तत्पूर्वी शाळेतील प्रवेशित मुलींनी स्वतःचे कल्पकतेने “रक्षाबंधन”तयार केले होते, हे विशेष.
सरतेशेवटी मा. अधिक्षक नरेंद्र बोरकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधन उत्सवाचे पारंपरिक महत्व सांगितले
:याप्रसंगी मा. संस्थापक/सचिव श्रीयुत. पुरुषोत्तम चौधरी सर यांचेकडून सर्व प्रवेशितांना भेट स्वरुपात स्कुल बैग चे वाटप करण्यात आले
:सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कर्मचारी रविंद्र राणे, बोकडे, बन्सोड, मेश्राम, सलामे, सौ.बोरकर इत्यादींचे सहकार्य लाभले