मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्येनंतर मृतदेह तलावात फेकला.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अपहरणानंतर पाच दिवसांनी मुलीचा मृतदेह तलावात आढळला.
गुरुवारी सकाळी आरोपींच्या घराजवळील तलावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, तेथे पोलीस पोहोचले. मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या शनिवारी मुलीचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी याआधीही धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर मुलीचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह तलावात फेकला. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापे मारले आहेत. अद्याप कुणालाही अटक केली नाही, असे सांगण्यात येत आहे.