नागपूरच्या विकासाचा नवा टप्पा, पाटणकर चौकात रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात!

नागपूरच्या विकासाचा नवा टप्पा, पाटणकर चौकात रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात!

नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक पाऊल…

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर सुधार प्रन्यास ५७२ अभिन्यास निधीतून मौजा इंदोरा, प्रभाग क्र. २ येथील नागभूमी सहकारी गृहनिर्माण सोसायटीजवळ, पाटणकर चौक येथे रस्त्याच्या खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

हा प्रकल्प परिसरातील नागरिकांना सोयीस्कर व सुरक्षित वाहतुकीची हमी देणार आहे.
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि विकासाचा प्रवास गतीमान करण्याचा आमचा प्रयत्न अखंड सुरू राहील.