National Road Safety Campaign at Wadner.
National Road Safety Campaign at Wadner.

वडणेर येथे राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान उपक्रम.

National Road Safety Campaign at Wadner.
National Road Safety Campaign at Wadner.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

वडणेर:- येथे ट्रैफिक पुलिस प्रवीण बोधाने तर पत्रकार राहुल दुरतकर यांच्या मार्गदर्शनातं वडणेर टोल नाक्यावर राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान उपक्रम पुरुषांना व विद्यार्थ्यांना ट्रैफिक पुलिस प्रवीण बोधाने व युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार राहुल दुरतकर माहिती देतांना नेहरू युवा केंद्राचा उपक्रम. नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने वडणेर येथे टोल नाक्यावर राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान 2021 उपक्रम राबविण्यात आला. युवा प्रेरना विद्यार्थी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक बोलत होते.

युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार राहुल दुरतकर व प्रमुख अतिथी म्हणून ट्रैफिक पुलिस कर्मचारी प्रवीण बोधाने, यांनी पुरुषांना व विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करावे, टूव्हीलर वर हेल्मेट वापरावे , असे मत प्रवीण बोधाने यांनी सांगितले, राहुल दुरतकर यांनी जीवन सूंदर असून आपला पाहण्याची दृष्टी बदला 18 वर्षा खाली युवकांनी विद्यार्थ्यांनि गाडी न चालवणे, इतरांचा विचार करावा, कारण आपण कुटुंबातील घटक आहेत, याची जाणीव असावे असे मत सांगितले. नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक हिंगणघाटचे सचिन महाजन यांनी हा कार्यक्रम पार पाडला, कार्यक्रमाला उपस्थित संकेत शिरपूरकर, गणेश राऊत, विवेक माळोदे तसेच पोलीस कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here