अखिल भारतीय भिक्खु संघ यांच्या उपस्थितीत.
कोपरगाव मध्ये वर्षवासानिमित्त आयोजित धम्मदेसना कार्यक्रम.
दैनिक मीडिया वार्ता. अहिल्यानगर:कोपरगाव.
सुनील भालेराव.
9370127037
दि.18.9.25.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील
सर्व श्रद्धावान उपासक बंधु–भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की, अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुद्ध धम्म प्रसारक मंडळ(ट्रस्ट) यांचे वतीने,
रविवार दि. 21.9.2025
रोजी सकाळी 10.00 वाजता वर्षावास पर्वा निमित्ताने
“पूज्य भंते धम्म बोधी(थेरो)”, संचालक पुरिटी ऑफ माईंड यू–ट्यूब चॅनेल, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “बुद्ध वंदना सुत्तपठण व धम्मदेसना” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तेव्हा या मंगलप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या “पवित्र धम्म देसनेचा” लाभ घ्यावा ही विनंती. याप्रसंगी सर्व उपस्थितांसाठी “भोजनाची व्यवस्था” करण्यात आलेली आहे, कृपया आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण लुंबिनी उपवन बुद्ध विहार, गोदावरी नदी पुलाजवळ,
नगर–मनमाड हायवे,
कोपरगाव.
त्याप्रसंगी सर्व कार्यक्रमाचे नियोजन
अध्यक्ष, सचिव व सर्व विश्वस्त, सदस्य यांच्याकडे राहणार आहे.
बुद्ध धम्म प्रसारक मंडळ (ट्रस्ट), लुंबिनी उपवन बुद्ध विहार,
कोपरगांव, जि. अहिल्यानगर.