ESIC हॉस्पिटल मध्ये कंत्राटी कामगारांची फसवणूक
मुंबई 20 सप्टेंबर 2025
हिरामण गोरेगावकर
8689818225
ESIS हॉस्पिटलमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांची कंत्राटदाराकडून होत असलेली आर्थिक फसवणूक उघड झाल्यानंतर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मेसर्स महाराणा एजन्सीला ब्लॅकलिस्ट करून बडतर्फ करण्यात आले, त्यामुळे कामगारांना न्याय मिळाला.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांनी आज मंत्रालयात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबीटकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
यावेळी सध्या ESIS मध्ये कार्यरत असलेल्या कामगारांनाच नवीन कंत्राटदाराकडे पुन्हा नोकरीवर घेतले जावे आणि त्यांच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये अशी विनंतीही करण्यात आली.