Home latest News आमदार थोरवे–सरपंच विरले यांच्या प्रयत्नांमुळे पेशवाई मार्गाचे काम मार्गी

आमदार थोरवे–सरपंच विरले यांच्या प्रयत्नांमुळे पेशवाई मार्गाचे काम मार्गी

537

आमदार थोरवे–सरपंच विरले यांच्या प्रयत्नांमुळे पेशवाई मार्गाचे काम मार्गी

संदेश साळुंके

कर्जत रायगड प्रतिनिधी

मो: ९०१११९९३३३

कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला आंबिवली ते साई मंदिर आणि साई मंदिर ते दामत रोड या पेशवाई मार्गाचा डांबरीकरण व दुरुस्तीचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आला आहे. सरपंच महेश विरले यांनी माहिती देताना सांगितले की, या रस्त्यावर गेल्या काही वर्षांत असंख्य खड्डे पडल्याने नागरिक, शाळकरी विद्यार्थी तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिकांनी वेळोवेळी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विविध कारणांमुळे हे काम वारंवार खंडित राहिले.

गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सरपंच महेश विरले यांनी नागरिकांसह पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर आमदार महेंद्र थोरवे यांनी संबंधित विभागाकडून मंजुरी मिळवून दिली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी आमदार थोरवे आणि सरपंच विरले यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. पेशवाई मार्ग सुस्थितीत झाल्यास गावाच्या संपर्कव्यवस्थेला आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.