म्हसळा पंचायत समितीच्या चार आणी जिल्हा परिषद दोन जागांचे आरक्षण जाहीर

53

म्हसळा पंचायत समितीच्या चार आणी जिल्हा परिषद दोन जागांचे आरक्षण जाहीर

संतोष उध्दरकर

म्हसळा: पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवारी पंचायत समिती कार्यालयात पार पडली. अध्यासी अधिकारी भारत वाघमारे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटविकास अधिकारी माधव जाधव यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आल्या. आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या अनेकांना मोठा धक्का बसला आहे.म्हसळा तालुक्यातील पंचायत समितीच्या चार गणातील सदस्यांकरिता ही सोडत काढण्यात आली असुन यामध्ये पाभरे गटात सर्वसाधारण महिला, पांगलोली गटात ना म प्र महिला, साळवींडे गटात सर्वसाधारण खुला, खरसई गटात सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले.या आरक्षण प्रक्रियेवेळी पक्षाच्या पदाधिकारी यांची उदासीनता दिसून आली असल्याने यावेळी मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हापरिषदच्या पाभरे आणि पांगलोली या जागांसाठी सुद्धा आरक्षण जाहीर झाले असून दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण खुला आरक्षण पडले आहे.