Home महाराष्ट्र म्हसळा पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणात विसंगती.स्थानिक बौद्ध समाजाची हरकत

म्हसळा पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणात विसंगती.स्थानिक बौद्ध समाजाची हरकत

128

म्हसळा पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणात विसंगती.स्थानिक बौद्ध समाजाची हरकत

म्हसळा पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणात विसंगती.स्थानिक बौद्ध समाजाची हरकत

म्हसळा:संतोष उध्दरकर.

म्हसळा:म्हसळा पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत सभापती पद अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र म्हसळा पंचायत समितीच्या गणनिहाय सदस्य पदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती महिलेसाठी एकही जागा राखीव नसल्यामुळे सभापती पद अडीच वर्षे रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या आरक्षणातील विसंगतीविरोधात स्थानिक बौद्ध समाजाच्या नेत्यांनी म्हसळा तहसीलदार कार्यालयात हरकत दाखल केली आहे.गेल्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सभापती पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली होती.त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या गणनिहाय सदस्य पदांचे आरक्षण जाहीर झाले.या आरक्षणात चार गणांपैकी नामनिर्देशित महिला, सर्वसाधारण महिला आणि दोन सर्वसाधारण जागा राखीव आहेत. अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी कोणतीही जागा राखीव नसल्यामुळे, त्या प्रवर्गातील कोणतीही महिला सभापती पदासाठी निवडून येऊ शकणार नाही.या विरोधात बौद्ध समाजाचे नेते अनिल कासारे,सरपंच चंद्रकांत पवार,ग्रामपंचायत सदस्या शीला पवार आणि सुधाकर येलवे यांनी तहसीलदार यांच्याकडे हरकत दाखल केली आहे.त्यांनी सभापती पदासाठी आरक्षणानुसार किमान एका गणात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी जागा राखीव करण्यात यावी अशी मागणी केली आहे.महसूल अव्वल कारकून श्री.धोंडगे यांच्या मार्फत ही हरकत जिल्हाधिकारी रायगड व म्हसळा तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आली असून,योग्य त्या सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.स्थानिक स्तरावर या मुद्द्यावरून असंतोष निर्माण झाला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.