भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर उभारण्यासाठी ₹625 कोटी देण्याचे आयसीआयसीआय बँकेचे आश्वासन

74

भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्राच्या
इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर उभारण्यासाठी ₹625 कोटी देण्याचे आयसीआयसीआय बँकेचे आश्वासन

भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्राच्या
इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर उभारण्यासाठी ₹625 कोटी देण्याचे आयसीआयसीआय बँकेचे आश्वासन

कृष्णा गायकवाड

नवीमुंबई :कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी खारघर नवी मुंबईतील टीएमसीच्या प्रगत केंद्रात नवीन कॅन्सर केअर इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची घोषणा आयसीआयसीआय बँक आणि टाटा मेमोरियल सेंटरने केली. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत 625 कोटी रुपयांच्या योगदानाच्या साहाय्याने हे केंद्र भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्रांपैकी एक असेल. तसेच अत्याधुनिक कर्करोग उपचार तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. महाराष्ट्रातील नवी मुंबई, पंजाबमधील मुल्लानपूर (नवीन चंदीगड) आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे प्रत्येकी एक अशा तीन अत्याधुनिक कॅन्सर केअर इमारतींच्या उभारणीसाठी बँकेने टीएमसीला ₹1,800 कोटी देण्याचे आश्वासन दिले असून, हे केंद्र हा त्याचाच एक भाग आहे.

‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमीपूजन तसेच पायाभरणीचा समारंभ आज करण्यात आला. आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कुमार सिन्हा, श्री. संदीप बत्रा, कार्यकारी संचालक, आयसीआयसीआय बँक; श्री. अजय गुप्ता, कार्यकारी संचालक, आयसीआयसीआय बॅंक आणि डॉ. सुदीप गुप्ता, संचालक, टीएमसी हे यावेळी उपस्थित होते.

तळमजला तसेच दोन बेसमेंट असलेली ही 11 मजली इमारत 3.4 लाख चौ. फुटांवर बांधली जाईल. यामध्ये 12 अत्याधुनिक लिनियर एक्सीलरेटर्स (LINACs) आणि कर्करोगाशी संबंधित इतर प्रगत उपकरणे असतील. LINACs कर्करोगाच्या पेशींना अचूक रेडिएशन देतात ज्यामुळे आसपासच्या निरोगी ऊतींचे नुकसान कमी होते.

‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ दरवर्षी 7,200 रुग्णांना रेडिएशन थेरपीची सोय उपलब्ध करून देईल. या अंतर्गत रुग्णांची दोन लाखांहून अधिक रेडिएशन सत्रांची सोय केली जाईल. या व्यतिरिक्त, वर्षभरात 25,000 नवीन रुग्णांना ओपीडी सल्ला तसेच निदान करण्यास मदत करेल. हे केंद्र 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आयसीआयसीआय बँकेची सीएसआर शाखा, आयसीआयसीआय फाऊंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथ, या केंद्राचे बांधकाम आणि एकूणच कामकाजावर देखरेख ठेवेल.

या प्रसंगी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष श्री. प्रदीप कुमार सिन्हा म्हणाले, “आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ या आपल्या सीएसआर शाखेद्वारे आयसीआयसीआय बँक आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका आणि सामुदायिक विकास प्रकल्प या चार संकल्पनांवर काम करते आहे. देशातील महत्त्वाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत असलेल्या कर्करोग काळजी मोहिमेत टीएमसीसोबत भागीदारी करताना आम्ही आनंदी आहोत. हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर आणि संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ रेडिएशन थेरपीसाठी भारतातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असेल. यामुळे समाजात मोठ्या संख्येने गरज असलेल्या समुदायांना प्रगत रेडिएशन थेरपीची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढेल.”

बँकेचे कार्यकारी संचालक श्री. संदीप बत्रा म्हणाले, “देशातील कर्करोगासाठी आवश्यक आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विशाखापट्टणम, नवी मुंबई आणि मुल्लानपूर येथे तीन नवीन कँसर केअर रुग्णालये स्थापन करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरला ₹1,800 कोटी देण्याचे आमचे आश्वासन आहे. विशाखापट्टणम येथील नवीन ब्लॉकचे बांधकाम चार महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. तर नवी मुंबईतील ही नवीन इमारत अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज असेल. सल्ला देण्याबरोबरच आजाराचे निदान करणे यामुळे या केंद्रातील रेडिएशन उपचारांची सध्याची क्षमता सहा पटीने वाढवेल. कर्करोगावरील उपचार अधिक प्रगत करण्यासाठी तसेच रुग्णांसाठी ते अधिक सुलभ करण्यासाठी टीएमसीसोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे.”

नवी मुंबई, नवीन चंदीगड आणि विशाखापट्टणम येथे तीन नवीन ब्लॉक्स स्थापन करण्यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथने दिलेल्या भक्कम पाठबळासाठी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता त्यांचे मनापासून आभार मानतात. ते म्हणाले, “या सुविधांमुळे वंचित रुग्णांना अत्याधुनिक, पुरावा आधारित उपचार पद्धतीमुळे उपचारांना प्रतिसाद लगेच कळेल आणि येणाऱ्या वर्षांसाठी आमची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. हे ब्लॉक लहान मुलांना तसेच प्रौढांना होणाऱ्या ब्लड कॅन्सरसाठी (रक्ताचा कर्करोग) उत्कृष्टता केंद्रे स्थापन करतील. तसेच भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन ऑन्कोलॉजी सुविधांपैकी ते एक असतील. देशभरातील सर्वाधिक गरजू कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक, काळजीवाहू उपचार प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला ही केंद्रे बळकटी देतील.”

अ‍ॅक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, “या सुविधेमुळे टाटा मेमोरियल सेंटरमधील एक युनिट – ऍडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हे परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक उपचार देऊ शकतील. कर्करोगाचे वाढते रुग्ण पाहता देशात तातडीने आवश्यक असलेल्या वैद्यकीय, तांत्रिक आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी देखील याचा वापर केला जाईल. संस्थेच्या क्लिनिकल आणि ट्रान्सलेशनल रिसर्च क्षमतेसाठी हे मोठे प्रोत्साहन ठरेल.”

टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी.एस. प्रमेश म्हणाले, “अत्याधुनिक रेडिएशन उपचार पायाभूत सुविधांचा समावेश असलेल्या ACTREC मध्ये नवीन कर्करोग सुविधा स्थापन करण्यासाठी आम्ही आयसीआयसीआय फाउंडेशन आणि आयसीआयसीआय बँकेचे आभारी आहोत. या आर्थिक मदतीसाठी आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो. विशेष म्हणजे, केवळ आर्थिक मदत करून ते थांबले नाहीत तर या संपूर्ण प्रक्रियेत त्याचा सहभाग आहे. मुख्य म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष काम देखील केले आहे. त्यांचे हे सहकार्य भागीदारी देशभरातील रुग्णांना लाभदायक ठरणारे समान, अत्याधुनिक कर्करोग उपचार आणि अत्याधुनिक संशोधन प्रदान करण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेला बळकटी देते.”

आयसीआयसीआय फाऊंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये याचा समावेश:
• अचूक थेरपीसाठी प्रगत रेडिएशन उपकरणे
• बाहेरील तसेच रुग्णालयातील रुग्णांसाठी एमआरआय, सीटी स्कॅनर, सीटी सिम्युलेटर सारख्या रेडिओलॉजी सुविधा
• वैद्यकीय व्यावसायिकांसाठी संशोधन आणि प्रशिक्षण सुविधा