विद्यार्थ्याकडून शाळेला कपाट भेट
कळंब, प्रतिनिधी
कळंब, जि.धाराशिव – (dharashiv#दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपूरा येथे इयत्ता दहावीच्या २००५ — २००६ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीकृष्ण कळंबकर पुणे,(pune)प्रा. संजय घुले संचालक ऑप्टेक कम्प्युटर, संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस, ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी
शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे, सहशिक्षक एच. ए. पान ढवळे, एस. एस. डिकले, बी. व्ही. ओव्हाळ, यांचा सत्कार करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विनायक शिंदे व विनोद चाळक यांचा सत्कार केला
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक श्रीकृष्ण कळंबकर पुणे व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक कपाट भेट दिले. त्याचा स्वीकार मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी केला ,यानंतर प्रमुख पाहुणे यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला.
यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले मनोगतात या शाळेमुळे आम्हाला खूप चांगले संस्कार मिळाले दिशा मिळाली आज आमची जी काही प्रगती आहे ती प्रगती या शाळेमुळे व शाळेतील सर्व गुरुजनामुळे झाली आहे असे कृतज्ञ पूर्ण उद्गार काढले, विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला, यानंतर प्रमुख पाहुणे उद्योजक श्रीकृष्ण कळंबकर पुणे, प्रा. संजय घुले, बाळकृष्ण धस, ज्येष्ठ पत्रकार(repoter) माधव सिंग राजपूत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांनी भावी जीवनात यशस्वी व्हावे म्हणून शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना एक पेन व बुके देऊन सत्कार केला. अध्यक्षीय समारोप भाषण मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी अन्नपूर्णा शिंदे ,पल्लवी गायकवाड, विशाल आंबीरकर, नरसिंग वाघमारे ,उत्तरा चव्हाण, अझरुद्दीन शेख, संदीप गायकवाड ,प्रवीण वाघमारे, अण्णाभाऊ रितापुरे, भरत गायकवाड, राम रतन भालेकर, सुनील कांबळे, मनोज वाघमारे, शबाना शेख, दिपाली चाळक, अनिता गायकवाड, सुवर्णा खापे, नितीन कदम,सुदर्शन गायकवाड, लहू शिंदे, गणपती झोंबाडे, राम गायकवाड, नामदेव गायकवाड गणेश जाधव, संपदा बगाडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी बगाडे हिने तर आभार प्रदर्शन नरसिंग वाघमारे यांनी मानले. राष्ट्रगीत गायनानंतर पुन्हा भेटण्याचा संकल्प करून या माजी विद्यार्थ्यांनी निरोप घेतला,









