संत तुकोबाराय धामात भक्तीचा सोहळा — २५,००० दिव्यांनी झळाळले आकाश!
केज(प्रतिनिधी)(kej) दि.23 ऑक्टोबर
श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावन धाम येथे यंदाही २५,००० दिव्यांचा दिमाखदार दीपोत्सव अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या प्रेरणेतून करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक स्वरूपात साजरा होणारा हा दीपोत्सव आज महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाला आहे. दीपोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह दूरवरच्या गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. महाराष्ट्राच्या(maharashtra )कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांनी दिव्यांच्या प्रकाशात संत तुकोबारायांच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली.
या दिव्य सोहळ्याला राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून तेज आणले. विशेष म्हणजे आंबा साखर(sugar) कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर साहेब यांची उपस्थिती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न केले. दीपोत्सवाच्या निमित्ताने आयोजित रजनी कार्यक्रमात गणेश महाराज भगत यांच्या सुमधुर वाणीने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
या दिव्य दीपोत्सवाने संत तुकोबारायांच्या नामस्मरणाचा जयघोष आकाशात दुमदुमला आणि श्रद्धा, भक्ती व संस्कृतीचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला.









