मा. संजयजी पंडित यांना मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू पुरस्काराने सन्मानित
अच्युत पौळ
कळंब ,प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक,नाभिक समाज भूषण, निर्भीड पत्रकार मा. संजयजी राजाराम पंडित यांना
पत्रकारिता आणि कुशल समाज संघटन या क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाहु महोत्सव २०२५ च्या वतीने निर्भीड पत्रकारिता व कुशल समाज संघटक कार्यासाठी मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहु पुरस्काराने गौरविण्यात येत असून हा पुरस्कार वितरण सोहळा, रविवार दिनांक 30/11/2025 रोजी सायंकाळी 4:00 वाजता, रोटरी क्लब, दातेमळा, महेश सेवा संमती जवळ, इचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. तसेच त्यांच्या लेखनातून समाज प्रबोधनाचे कार्य अविरत पणे सतत सुरू असते संजयजी पंडित यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल कळंब तालुका नाभिक समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.









