म्हसळा शहराला मिळाला नवा नेतृत्व
म्हसळा: संतोष उध्दरकर.
म्हसळा: नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य निवडणुकिच्या तोंडावर रायगड जिल्हयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक संघटने मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून म्हसळा शहराचे धडाकेबाज व कट्टर शिवसैनिक अभय कलमकर यांची म्हसळा शिवसेना शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली असुन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख नंदु शिर्के यांच्या शिफारसीने निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले,गेली वीस वर्षे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कलमकर पक्षाचे प्रामाणिक पणे काम करीत असून त्यांच्या पत्नी या म्हसळा शहराच्या माजी सरपंच आहेत. अभय कलमकर यांची शहर प्रमुख पदी निवड झाल्यामुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शहरात फेरबदल झाल्यामुळे काही ठिकाणी चर्चेचा विषय बनला असून नव्या दमाचा शहर प्रमुख शहराला मिळाला असल्याचे देखील बोलले जात आहे.
————————————–
आगामी निवडणुकीच्या तोंडावर जरी बदल झाला असला तरी एक शिवसैनिक व शहर प्रमुख म्हणुन मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करेन, तसेच शहरात संघटना वाढवुन होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत म्हसळा नगरपंचायत वर भगवा फडकवणार…
अभय कलमकर
शहर प्रमुख, म्हसळा









