Home अलिबाग अलिबागमध्ये रंगणार दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन

अलिबागमध्ये रंगणार दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन

341
Oplus_16908288

काव्यलेखन, कथालेखन, दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

अलिबाग दिनांक – २९, मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळ व कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण साहित्य परीषद शाखा अलिबाग यांच्या सहकार्याने दिनांक ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी भंडारी भवन, श्रीबाग येथे जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, दीवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी साहित्याचा प्रचार, प्रसार व संवर्धनाच्या उ‌द्देशाने शासकीय अनुदानातून हे साहित्य संमेलन संपन्न होत असून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, गीतकार श्री. अरुण म्हात्रे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून तर रायगडचे कवी, लेखक श्री. रमेश धनावडे यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असल्याचे संमेलन कार्यकारिणी प्रमुख सौ. सुजाता पाटील यांनी जाहीर केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सन्मानिय सदस्य श्री. भरत गावडे व श्री. विठ्ठल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर साहित्य संमेलन होणार आहे.
काव्यलेखन स्पर्धेकरिता दीपक पाटील (8806802175), कवितालेखन स्पर्धेकरिता रुपेश पाटील (8087558641), दिवाळी अंक स्पर्धेकरिता महेश कवळे ( 9421171480) यांच्याकडे अधिक माहीतीसाठी संपर्क साधावा. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. तसेच चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखत, काव्यकट्टा, कथावाचन, व्याख्यान, सांस्कृतिक आविष्कार असे साहित्यिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील लेखक, कवी, साहित्यिकांनीसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कलारंग संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांनी केले आहे.
सदर दोन दिवस जिल्हा साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलन कार्यकारिणी संचालक म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील ॲड प्रसाद पाटील, माजी प्राचार्या संजिवनी नाईक, कलारंग संस्था समन्वयक श्री. एम. एस. बोघाणी, युवा कवी विजय म्हात्रे तसेच कोकण साहित्य परीषद शाखा अलिबागचे कार्यकारिणी सदस्य व सभासद कलारंगचे कलाकार विशेष परीश्रम घेत आहेत.

प्रसिद्धी: प्रकल्प वाणी
अध्यक्ष – कलारंग