Home latest News शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने मुरुड येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने मुरुड येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक

205

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने मुरुड येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक

दत्ता गोरे
लातूर प्रतिनिधी
मुरूड दि.२९ महाराष्ट्रा मध्ये सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर विविध पक्षांच्या नेत्यांची कार्यकर्त्याची बैठका व मिळावे पार पडत आहेत त्याच अनुषंगाने स्वराज्य संस्थेची म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा यामध्ये निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने लातूर ग्रामीण मधील मुरुड या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे व तालुका प्रमुख कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुरुड या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली या बैठकीस लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे यांनी मार्गदर्शन केले पुढील महिना दोन महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोणकोणत्या रणनीती आखायच्या आहेत त्या अनुषंगाने उपजिल्हाप्रमुखाने बैठक घेऊन शिवसैनिकांना तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा उप शाखाप्रमुख विभाग प्रमुखका ची बैठक मुंबई या ठिकाणी झाली यामध्ये शिवसेनेने ते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मतदार यादी मध्ये काय घोळ झाला आहे त्याबद्दल माहिती दिली व मतदार यादी मध्ये बोगस मतदार यादी तील नावे त्या संदर्भात जनजागृती करत माहिती देण्यात आली त्याचा अनुषंगाने आज लातूर ग्रामीण ची बैठक निवड या ठिकाणी झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले तसेच तालुका प्रमुख कैलास पाटील यांनी प्रस्तावित केले या बैठकीमध्ये मुरुडा अकोला येथील शिवसैनिकांचा प्रवेश शिवसेना उभाटा गटामध्ये झाला यावेळी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख तालुका सचिव तालुका समन्वयक तालुका संघटक विधानसभा संघटक विधानसभा समन्वयक उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख शहरप्रमुख आजी माजी शिवसैनिक या बैठकीमध्ये उपस्थित होते.