Home बीड राष्ट्रवादी( अजित पवार) गटांकडून तांबवा गणातून पंचायत समितीसाठी शंकर तपसे यांच्या मातोश्रीचे...

राष्ट्रवादी( अजित पवार) गटांकडून तांबवा गणातून पंचायत समितीसाठी शंकर तपसे यांच्या मातोश्रीचे नाव प्रामुख्याने चर्चेत.

236

राष्ट्रवादी( अजित पवार) गटांकडून तांबवा गणातून पंचायत समितीसाठी शंकर तपसे यांच्या मातोश्रीचे नाव प्रामुख्याने चर्चेत.

केज!प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका तब्बल सहा वर्षानंतर होत आहेत त्यांचा कार्यकाळ संपून तीन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली केज पंचायत समितीतील तांबवा गण ओपन महिलेसाठी सुटलेले आहे.

लांबवा पंचायत समिती गणातून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी
माजी मंत्री तथा आ.धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी तसेच राष्ट्रवादी(अजित पवार ) गटांकडून केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील राष्ट्रवादी कांग्रेस (अजीत पवार ) पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकर ( बापू ) तपसे हे गेल्या अनेक वर्षांपासून जनहिताची तसेच सामाजिक कामे करून नेहमीच जनतेच्या संपर्कात असणारे सामाजिक नेते आहेत, शंकर ( बापू ) तपसे यांच्या मातोश्रीचे नाव केज पंचायत समिती लांबवा गणातून प्रामुख्याने घेतले जात आहेत तसेच त्या प्रबळ दावेदार म्हणून जनतेतून चर्चेत आहेत.

शंकर( बापू ) तपसे यांच्या मातोश्री सौ.सत्वशीला तपसे यांनी अडीच वर्ष चंदनसावरगाव या गावचे उपसरपंच म्हणून यशस्वी रित्या काम केलेले आहे, त्या चंदनसावरगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान
सदस्या देखील आहेत शंकर (बापू )तपसे राजकीय, सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात तसेच शंकर ( बापू )तपसे मोठे उद्योजक असल्यामुळे त्यांचा केज तालुक्यात चांगला जनसंपर्क असून तो तालुक्यातील प्रत्येक तांडा, गाव, खेड्यापर्यंत आहे व त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांची जिल्ह्यात संपूर्ण बीड जिल्यात चांगली च ओळख आहे शंकर ( बापू ]तपसे यांचा तांबवा पंचायत समिती गणात दांडगा जनसंपर्क असून ते सततजनतेच्या सुखदुःखात तसेच सामाजिक कार्यात नहमी च सहभागी असतात त्यांचा सर्व जनमानसात दांडगा संपर्क असल्याने शंकर ( बापू )तपसे यांनी जनतेच्या सामाजिक प्रश्नांशी बांधिलकी जपली असून केज तालुक्यात त्यांना मानणाऱ्या समाजात त्यांचे नाव अग्रेसर असून (अजीत पवार )राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने सौ.सत्वशीला तपसे यांना येणाऱ्या पंचायत समिती च्या निवडणुका मध्ये संधी दिल्यास ते निश्चितच त्या संधीचे सोने करून तांबवा गणाचा सर्वांगीण विकास करतील,असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनतेतून व्यक्त होत आहे.शंकर ( बापू )तपसे हे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवतात त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे व जनसंपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) गटाचा उमेदवार सहज विजयी होईल,असे मत स्थानिक च्या जनतेतून व्यक्त होत आहे.