Home latest News कळंब बस स्थानकाची स्वच्छता समितीकडून तपासणी

कळंब बस स्थानकाची स्वच्छता समितीकडून तपासणी

58

कळंब बस स्थानकाची स्वच्छता समितीकडून तपासणी

कळंब प्रतिनिधी 

कळंब जि.धाराशिव– येथील बस स्थानकाची स्वच्छतेबाबतची उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक १ यांच्या समिती मार्फत दि . २४ नोहेंबर रोजी तपासणी करण्यात आली.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहिमे २०२५ अंतर्गत कळंब बस स्थानकाची स्वच्छतेबाबतची तपासणी मोहीम राबविण्यात आली .

या तपासणी समितीमध्ये उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक १ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये विविध विभागांना भेटी देण्यात आल्या व बस स्थानक स्वच्छता ,प्रवाशांना पिण्याचे पाण्याचा व्यवस्था ,त्याचबरोबर गाड्यांची पार्किंग ,सुलभ शौचालय, बस स्थानकाची रंगरंगोटी आदी बाबी तपासण्यात आल्या.

या नियंत्रण समितीमध्ये मुंबई विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीमती चेतना खिरवाडकर , प्रादेशिक अभियंता विवेक लोंढे , प्रवासी मित्र संघटनेचे प्रा . मोहन जाधव , कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक यांनी या समितीमध्ये काम पाहिले . यावेळी समितीने सर्व परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले . यावेळी त्यांचा प्रभारी आगार प्रमुख बालाजी भारती यांनी समिती प्रमुखांचे स्वागत केले . तर समितीने कर्मचाऱ्याचे यांचे कौतुक केले या स्वच्छता मोहीम तपासणीसाठी प्रभारी आगार प्रमुख बालाजी भारती , वाहतूक निरीक्षक निलेश जाधव ,विलास जाधव, वाहतूक नियंत्रक सुशिल हुंबे ,चेतन गोसावी , एस . व्ही . सारुक , प्रभाकर झांबरे व कार्यालयीन कर्मचारी ,यांत्रिक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .