सहा दिवसानंतर आंबेवाडी येथील उपोषणाला स्थागिती,
रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मध्यस्ती नंतर सहा दिवसानंतर आंबेवाडी येथील उपोषणाला स्थागिती,
आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा तीव्र उपोषण करणार, नागरिकांचा इशारा
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील
आंबेवाडी कोलाड वरसगांव येथिल VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला २०० मिटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात ठेवणे,सर्विस रोडचे अर्धवट असलेले काम पूर्ण करून देणे, गटारावरील झाकणे बसवून देणे,तसेच सदर अंडरपास पेण,नागोठणा,लोणेरे,महाड येथे ठेवले आहेत त्या धरतीवर करून देणे या प्रमुख मागण्यासाठी आंबेवाडी बाजारपेठेत आंबेवाडी कोलाड वरसगाव पंचक्रोशीतील सर्व जागरूक नागरिक यांनी सोमवार दि.५ /१/२०२६ रोजी साखळी उपोषण सुरु केले. असुन जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.
सलग सहा दिवस येथील नागरिकांचा साखळी उपोषण सुरु होता.त्या ठिकाणी शनिवार दि.१० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी धिरज शहा, रोहा तहसीलदार किशोर देशमुख तसेच कोलाड सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी उपोषणास बसलेल्या नागरिकांशी चर्चा केली.यानंतर रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांनी भरतशेठ गोगावले फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हा प्रशासन व महामार्ग संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल तो पर्यंत उपोषणास स्थगिती द्यावी असे लेखी निवेदनाद्वारे सांगण्यात आले
यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायततीचे माजी सरपंच सुरेशशेठ महाबळे,चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे,संजय कुर्ले,चंद्रकांत जाधव, समीर महाबळे,बबलु सय्यद, संजय लोटणकर,विजय बोरकर,मंगेश सरफळे,असिफशेठ सय्यद,उदय खामकर, दगडू हाटकर,,तसेच असंख्य व्यापारी,कोलाड परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
यानंतर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चालके यांच्या सुभहस्ते सरबत घेऊन सदर उपोषणाला स्थगिती देण्यात आली.परंतु मंत्रालयात १६ जानेवारी रोजी मिटींग घेऊन मार्ग निघाला नाही तर पुन्हा साखळी उपोषणाला सुरुवात करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे उपोषणास बसलेल्या नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.









