Home latest News श्री महेंद्र शेठ दळवी आमदार (शिवसेना शिंदे गट) आढावा बैठक वेश्वी येथे...

श्री महेंद्र शेठ दळवी आमदार (शिवसेना शिंदे गट) आढावा बैठक वेश्वी येथे संपन्न झाली.

169

श्री महेंद्र शेठ दळवी आमदार (शिवसेना शिंदे गट) आढावा बैठक वेश्वी येथे संपन्न झाली.

भागवत जाधव,
अलिबाग

अलिबाग:चेंढरे जिल्हा परिषद गण आयोजित आढावा बैठक सह्याद्री गार्डन वेश्वी अलिबाग येथे नुकतीच संपन्न झाली. ही सभा माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित राजाबाई केणी, मानसी ताई दळवी, आदिती नाईक दळवी ,दीपक जी रानवडे, तसेच इतर माननीय कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्हा परिषद चेंढरे गणासाठी अदिती नाईक दळवी यांची उमेदवारी जाहीर झाली व पंचायत समिती साठी मृणाली रोहन पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

या आढावा बैठकीमध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या यामध्ये अलिबाग चेंढरे ग्रामपंचायत महिला विभाग प्रमुख म्हणून सौ प्रणिता ताई प्रल्हाद म्हात्रे यांची निवड करण्यात आली. तसेच धरण येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या सभेसाठी कार्यकर्त्यांची चांगली उपस्थिती होती.