Home latest News राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

110

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी 8806689909 :

सिंदेवाही :- जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिन च्या औचित्याने करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विनोद कोवे सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नितीन भेंडाळे सर , संस्थापक संचालक स्वप्नझेप करिअर अकॅडमी तळोधी बा हे होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत खोब्रागडे सर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
नितीन भेंडाळे सर यांनी स्पर्धा परीक्षा चे स्वरूप सांगताना विविध पद व पदांकरिता लागणारे शिक्षण यांचे वर्णन केले .
शाळेत असताना शालेय अभ्यासक्रम वर लक्ष्य देणे गरजेचे आहे कारण हाच अभ्यासक्रम आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये असतो .
न्यूज पेपर चे महत्व विषद करताना आवश्यक असे घटक कसे वाचायचे नोट्स कसे काढायचे संपादकीय पानाचे महत्व क्रीडा व अर्थ पान ची टिप्पणी कशी घ्यायची ते सांगितले.
शासकीय नौकरी मध्ये ग्रामीण विद्यार्थी सुद्धा चांगलं यश संपादन करू शकतो फक्त मनात जिद्द ठेवावी लागते.
वेळेचे व्यवस्थापन करणे , आपली आर्थिक बाजू लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणे ,
कठीण काहीही नाही सर्व सोप आहे फक्त ते साध्य करता आले पाहिजे. शिक्षणाचे महत्व विषद करताना शिक्षणाविना काहीही साध्य होत नाही. शिक्षणाने बुद्धी विकसित होते ,
स्पर्धा परीक्षेत जाताना ईमानदारी ही खूप महत्त्वाची आहे,
स्त्रियांचे सन्मान हे सर्वांची जिम्मेदारी आहे असे , विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात विनोद कोवे सरानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे टिप्पणी घेऊन ठेवा , त्या सर्व गोष्टींवर तत्काळ अंमलबजावणी करीत चला . शाळेत उपलब्ध असलेल्या सर्व सोयींचा फायदा घेत चला .तसेच शाळा व्यवस्थापन दर वेळेस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम नेहमी घेत असते . पालकांनी सुद्धा मुलांच्या विकासाकरिता लक्ष्य ठेवने आवश्यक आहे.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.