Home latest News वडगाव माळी येथे राष्ट्रीय बालिका दिन उत्सहात साजरा

वडगाव माळी येथे राष्ट्रीय बालिका दिन उत्सहात साजरा

190

तेजस्विनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, वडगाव माळी यांचे वतीने राष्ट्रीय बालिका दिनाचे आयोजन

गजेंद्र गवई

मेहकर: बेटी हैं तो कल हैं… अर्थात आजची मुलगी उद्याची माता… मातेमुळे जगाचा मानवी वंश वाढतो आहे.त्यासाठी मुलगी वाचवा.. मुलगी शिकवा..देशाचे भवि्तव्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे..आजची मुलगी म्हणजे उद्याचे सामर्थ्य आहे.. तिला शिक्षण,सुरक्षा आणि सामान संधी दिल्या तर ती समाज आणि देशाचे भविष्य घडवेल हा विचार संपूर्ण समाजात प्रसारित व्हावा यासाठी मेहकर तालुक्यातील मौ. वडगाव माळी येथे २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मेहकर भाग -१ प्रकल्प अधिकारी संदीप गवळी व पर्यवेक्षिका सोनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस्विनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, वडगाव माळी यांचे वतीने राष्ट्रीय बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीता शिवाजी रोही होत्या तर तेजस्विनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान च्या पदाधिकारी, अंगणवाडी सेविका सविता गवई,शैला पाटोळे,मदतनीस कुंता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थित महिला व बालिका यांनी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीमई फुले, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन केले.

याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, मातोश्री रमाई आंबेडकर, सैनिक, पायलट, राष्ट्रपती, कलेक्टर यांचे वेशभूषा केलेल्या बालिका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

याप्रसंगी अंगणवाडी सेविका सविता गवई यांनी बेटी बचाओ.. बेटी पढाओ याविषयीं मनोगत व्यक्त करून मुलीच्या जन्माचे स्वागत सारखे उपक्रम समाजात रूढ झाले पाहिजे त्यासाठी अंगणवाडी व तेजस्विनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान पुढाकार घेणार अशी माहिती दिली. याप्रसंगी गावातील ०ते ०६ या वयोगटातील बालकांच्या माता बहुसंख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किरण मोठे, प्रणिता बगाडे,शुभांगी जाधव, दीपाली जाधव,राधिका मोठे, सुषमा वैराळ,अंकिता खडसे, सजन इंगळे,निर्मला शरणागत,अनिता गवई, सुनिता गवई,सावित्रा गवई, संगीता गवई,ताराबाई खंडारे, सुमनबाई गवई,पार्वती गवई, विद्या चव्हाण,रंजना गवई यांचे सह तेजस्विनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान वडगाव माळी च्या सदस्य महिला पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा गवई यांनी केले तर आभार सुनिता गवई यांनी मानले.