Home latest News न्यू प्रगती शिक्षण संस्थेचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न..

न्यू प्रगती शिक्षण संस्थेचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न..

148

शैक्षणिक क्षेत्र सोबतच सामाजिक बांधिलकी जपली…

ठाणे मुंबई

२६ जानेवारी: भारत हा असा देश आहे इथे अनेक परपरा रुढी संस्कृती सामाजिक बांधिलकी जपणारा देश आहे त्यात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिन तर एखाद्या सणा पेक्षाही उत्साहात साजरा केला जातो अगदी अबाल वृद्धांपासून सगळेच आत्मीयतेने सहभागी होत असतात अशाच प्रकारे न्यू प्रगती शिक्षण संस्थेने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत महिलांना एकत्रित आणणारा हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा केला.

न्यू प्रगती शिक्षण संस्थेने आजवर असे अनेक कार्यक्रम आयोजित करून आपली देशाप्रती असलेली बांधिलकी जपत सर्वांसमोर आदर्श ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी स्वतः ला त्यामध्ये झोकून द्यावे लागते त्याच प्रमाणे न्यू प्रगती शिक्षण संस्थेच्या संस्थापिका आणीता खरात मॅडम यांनीही अशाच प्रकारे संस्थेसाठी , समजासाठी , स्वतः ला या कार्यात झोकून आपली सामजिक बांधिलकी जपली आहे त्यात त्यांना संस्थेचे सर्व सदस्य तसेच अंगणवाडी सेविका यांचं ही मोलाचं योगदान देत असतात यामध्ये या सर्वांच्या सहकार्याने २६ जानेवारी रोजी हे कार्यक्रम अगदी मनसोक्त आनंद घेत उत्साहात संपन्न केला.