Home latest News वरदडा येथील पारधी आदिवासी आश्रम शाळेस “मुकनायक” वर्धापन दिनी जेष्ठ पत्रकार प्रा....

वरदडा येथील पारधी आदिवासी आश्रम शाळेस “मुकनायक” वर्धापन दिनी जेष्ठ पत्रकार प्रा. गजेंद्र गवई यांची विशेष भेट…

280

युवराज पवार यांचे कार्य विशेष उल्लेखनीय व प्रशंसनिय..

(पत्रकार /प्रतिनिधी )

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे होऊन गेले. देश संविधान अमृत महोत्सव साजरा करत आहे. सर्वत्र संविधानाची प्रस्ताविका व संविधान मूल्ये प्रसारित करीत असताना देशाच्या प्रत्येक नागरिकांस मूलभूत हक्क, अधिकार संविधान प्रदान करीत आहे. परंतु आज हीं देशाच्या स्वातंत्र्याची फळे शोषित, पीडित, मागासवर्गीय, आदिवासी चाखतो आहे का? प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असताना सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग राबवित असताना, शाळा बाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी विविध उपाय योजना उपक्रम असताना आज ही आदिवासी, पारधी बेड्यावर उघडी नागडी शाळा बाह्य मुले शिक्षणापासुन वंचित आहेत. पारधी समाजावर वर्षानुवर्षे गुन्हेगारीचा असलेला शिक्का मोडीत काढण्यासाठी.. शिकारीचे, गुन्हेगारीचे जीवन सकारात्मक सर्वसामान्य माणसासारखे सुकर व्हावे यासाठी जीवनभर समाजाला शिक्षणाने सुसंस्कृत करण्यासाठी ध्येयने झपाटलेला सुशिक्षित पारधी युवक युवराज पवार सहपरिवार मेहनत करत आहे. अशा ध्येयवेड्या युवराज पवार ने शासनाचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुदान नसताना तब्ब्ल १२० पारधी मुलांना, पारधी बेड्यातून आणून सुसंस्कृत माणूस म्हणून उभे करण्यासाठी सुरु केलेल्या पारधी आश्रम शाळेस ३१ जानेवारी “मुकनायक ” वृत्त पत्राच्या १०६ व्या वर्धापन दिनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चे जेष्ठ पत्रकार, संवाद दाता तथा दैनिक मीडिया वार्ता न्यूज चे महाराष्ट्र सिनियर रिपोर्टर प्रा. गजेंद्र गवई यांनी विशेष भेट दिली.

या निमित्ताने श्रीकृष्ण कृपा बहुउद्देशीय फासे पारधी समाज विकास संस्था अंतर्गत समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा, वरदाडा आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष युवराज पवार यांनी जेष्ठ पत्रकार तथा प्रबोधनकार प्रा. गजेंद्र गवई व टीम चे विशेष स्वागत करून आदिवासी आश्रम उभारणी, अडचणी या बाबत माहिती दिली.

याप्रसंगी प्रा. गजेंद्र गवई यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी भारतीय संविधान निर्माते, शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मुकनायक “या पाक्षीकाची सुरुवात केली. समस्याग्रस्त मुक्यांचा नायक होऊन बाबासाहेबांनी वाचा फोडण्याचे काम केले. तोच आदर्श युवराज पवार घेऊन या शिक्षणापासुन वंचित १२० मुलांना सर्वोतोपरी पालन पोषण करून चांगले भारतीय नागरिक घडविण्याचा प्रशंसनिय प्रयत्न करत आहेत. या कार्यास शासनासह सर्व समाजाने सर्व प्रकारचे सहकार्य व योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी लॉर्ड बुद्धा टीव्ही चे कॅमेरामन शशिकांत जाधव यांचे सह आश्रम शाळेतील शिक्षक वृंद, अरुण सरकटे, नम्रता सरकटे,

शक्तिमान पवार, लक्ष्मी पवार, संस्था सचिव रत्ना पवार, उपाध्यक्ष प्रमिला पवार, स्वयंपाकि मथुरा पवार, संध्या पवार,लिपिक रितेश पवार यांची उपस्थिती होती.

सदर पारधी आश्रम शाळेस शासन मान्यता, अनुदान व दानशूर व्यक्तीची आर्थिक मदत मिळणे साठी मिडीयेटर म्हणून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे प्रा. गजेंद्र गवई यांनी आश्वासित केले.