रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून संपूर्ण देशात मरणोत्तर देहदान, अवयवदान असे उपक्रम राबविण्यात येत आहे.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्याच प्रेरणेतून गोंदिया जिल्ह्यातील मुक्काम असोली येथील रहिवासी स्वर्गीय लेखराम सुखराम उके (वय 65) यांच्या मागील स्वेच्छेनुसार त्यांचे दिनांक 11 मे रोजी मरणोत्तर नेत्रदान गोंदिया येथील केटीएस शासकीय रुग्णालयात करण्यात आले.
याप्रसंगी त्यांचे नातेवाईक पत्नी लक्ष्मीबाई लेखराम उके, मोठा मुलगा महेंद्र लेखराम उके, लहान मुलगा आशिष लेखराम उके, मुलगी आशा दखणे, मनीषा दखणे, नातू राज उके तसेच गावकरी उपस्थित होते.
यावेळी रामानंदाचार्य संप्रदायाचे पीठ महिला निरीक्षक वैशालीताई चतुर, जिल्हाध्यक्ष मूलचंद खांडवाये, जनगणना प्रमुख रोशन कुर्वे, ब्लड कॅम्प प्रमुख दामोदर शेंडे, तंत्रज्ञान प्रमुख शुभम दिघोरे, देणगी प्रमुख पंकज खांडवाये, तालुका अध्यक्ष दिलीप ठाकूर, तालुका महिला प्रमुख वैशालीताई राऊत, माजी जिल्हा ॲम्बुलन्स प्रमुख गणेश मेश्राम, आसोली सेवा केंद्र अध्यक्ष सविता उके, सेवा केंद्र युवा प्रमुख राजेश मठाले, सेवा केंद्र मेजर व्यंकट उके, कामठा सेवा केंद्र अध्यक्ष देवेंद्र कुर्वे, फुलचूर सेवा केंद्र मेजर श्रीरंग राऊत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.









