Home latest News म्हसळा -श्रीवर्धन राज्य मार्ग ठरतोय मृत्युचा सापळा

म्हसळा -श्रीवर्धन राज्य मार्ग ठरतोय मृत्युचा सापळा

34

बेदकरपणे चालणाऱ्या मायनिंगच्या डंपरमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संतोष उध्दरकर

म्हसळा: म्हसळा – श्रीवर्धन राज्य मार्ग ठरतोय प्रवाशांसाठी मृत्युचा सापळा, गेले कित्येक महिन्यांपासुन या मार्गावर बेकायदेशीर चालणारे ओव्हरलोड मायनिंग बॉक्साईडची वाहतुक सर्रास होताना दिसत आहे, या मार्गाची क्षमता पंधरा ते सोळा टनाची असली तरी 28 ते 30 टनानी भरलेले ओव्हरलोड बॉक्साईड वाहतुक सर्व नियम धाब्यावर बसवून होत असुन आज पर्यंत या मार्गावर अनेक अपघात होऊन कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहे तर कित्येकांना अपंगत्व आले असले तरी महसुल विभाग व आर टी ओ विभाग याकडे जाणिव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे का असा सर्व सामान्य प्रवासी, स्थानिक नागरीक यांच्या कडून प्रश्न उपस्थित होत आहे,या मार्गावर हरिहरेश्वर पर्यटन स्थळ असल्याने उन्हाळी सुट्टी पडली असून तसेच दर शनिवार, रविवार या मार्गावर हजारो पर्यटक प्रवास करीत असतात, या मार्गांवर लहान मोठी गाव असून कामा निमित्त, व्यवसाय, नोकरी, तसेच शाळेतील विद्यार्थी, स्थानिक या राज्य मार्गाने प्रवास करीत असुन बेदकरपणे चालणाऱ्या ओव्हरलोड बॉक्साईड डंपर मुळे या सर्वांचा सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण होत असून अजुन किती जणांना आपले प्राण गमवावे लागणार आहे त्यामुळे या प्रशासनाला जाग येणार आहे.

हा जिवघेणा प्रवास थांबणार आहे का..? असा थेट प्रश्न संबंधीत विभागाला जनतेतुन विचाण्यात येत आहे.