Sending a message to WhatsApp group, Mahur depot carrier committed suicide by hanging himself in ST bus.
Sending a message to WhatsApp group, Mahur depot carrier committed suicide by hanging himself in ST bus.

व्हाटसप ग्रुपवर संदेश पाठवून, माहूर आगाराच्या वाहकाने एसटी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या.

Sending a message to WhatsApp group, Mahur depot carrier committed suicide by hanging himself in ST bus.
Sending a message to WhatsApp group, Mahur depot carrier committed suicide by hanging himself in ST bus.

जिल्हा नांदेड प्रतिनिधी

माहूर, दि. 26 फेब्रुवारी:- वाहकाने एसटी बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना शुक्रवारी ता. 26 रोजी सकाळी सहा वाजत उघडकीस आली. माहूर आगाराची परळी- माहूर ही बस एमएच 20 बी.एल.4015 ही माहूरच्या एसटी आगारात ता. 25 च्या रात्री उभी केलेली होती. सदर बसची माहूरहून परळीकडे रवाना होण्याची वेळ सकाळी 7.30 ची असल्याने ता. 26 रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान स्वच्छता कर्मचारी बस स्वच्छ  करण्यासाठी गेले असता सदर बसमध्ये गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत वाहक संजय संभाजी जानकर हे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आगारप्रमुख व्ही. टी. धुतमल यांनी दिलेल्या माहितीवरुन माहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव रिठे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. बिट हवालदार श्री. आडे, श्री. मुटकुळे, श्री. गंगाधर खामनकर, प्रकाश देशमुख यांचेसमवेत श्री. आडे यांनी घटनास्थळ पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे पाठविला. ग्रामीण रुग्णालयात डॉ. विजय मोरे यांनी प्रेताचे शवविच्छेदन केले. सदर वाहकाची ता. 24 रोजी धनोडा येथे बस तपासणी पथकाने केली. त्यावेळी तिकीट मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे काही प्रवाशांचे तिकीट निघाले नसल्याने सदर बाब वरिष्ठांनी लक्षात न घेता कारवाई करण्याचे संकेत दिल्याने पश्चाताप होऊन आत्महत्या करणाऱ्या वाहक जानकर यांनी रापम माहूर आगाराच्या व्हाटसप ग्रुपवर ता. 26 रोजी सकाळी चार वाजता व्हायरल केलेल्या लेखी मृत्यूपूर्व जबाबात नमूद केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here