अज्ञात ट्रकटर च्या धडकेत मेंडकी गावातील उपसरपंच ठार.

60

अज्ञात ट्रकटर च्या धडकेत मेंडकी गावातील उपसरपंच ठार.

A sub-panch of Mendki village was killed in an unidentified tractor collision.
A sub-panch of Mendki village was killed in an unidentified tractor collision.

अमोल माकोडे ब्रम्हपुरी प्रतिनिधी

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील रानबोथली गावाजवळ आज सायंकाळी 6 च्या सुमारास एक अज्ञात ट्रकटर धडकेने मेंडकी गावातील उपसरपंच उत्तम ऋषीजी सोनूले वय 40 राहणार मेंडकी या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला एक व्यक्ती जखमी आहे.

उत्तम ऋषीजी सोनूले आपल्या दुचाकी वाहनाने मेडकीला परत जात असताना राणबोथली या गावी अज्ञात ट्रकटर ने दुचाकीला धडक दिल्याने त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत चा व्यक्ती गंभीर जखमी आहे. उत्तम सोनूले हे मेंडकीचे नवनिर्वाचित उपसरपंच होते त्यांच्या या अपघाती निधनाने मेंडकी गावात शोककळा पसरली आहे.