पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीमध्ये मुस्लिम बांधवांचा जाहीर प्रवेश.
✒पुणे जिल्हा प्रतिनिधी ✒
पिंपरी-चिंचवड, दि.26 फेब्रुवारी:- शहरातील अनेक मुस्लीम बांधवांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांना वंचित बहुजन आघाडीचे ध्येयधोरणे 2022 मध्ये होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकावरती तायडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फारूक कुरेशी,इक्बाल शेख,मोहम्मद दिलेर खान,खाजा कुरेशी,समीर कुरेशी,अमीर कुरेशी,जमीर कुरेशी,आरिफ कुरेशी,लियाकत मीर,आसिफ शेख,याकुब शेख,आनंद कलवले, सुनिता आठवले,अनिता वैरागळ, अलका जाधव,शामल भिसे आदिंचा वंचित बहुजन आघाडीचे उपरणे देऊन पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मा.नगरसेवक कार्याध्यक्ष अंकुश कानडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा.अध्यक्ष संतोष जोगदंड, शहर संघटक बाबुराव फुलमाळी, कार्यकारणी सदस्य राजेंद्र साळवे, भीमाशंकर शिंदे, राहुल बनसोडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.