Four-year-old Chimurda dies in vehicle collision in Bramhapuri taluka.
Four-year-old Chimurda dies in vehicle collision in Bramhapuri taluka.

ब्रम्हपुरी तालुक्यात वाहनांच्या धडकेने चार वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू.

 Four-year-old Chimurda dies in vehicle collision in Bramhapuri taluka.
Four-year-old Chimurda dies in vehicle collision in Bramhapuri taluka.

✒अमोल माकोडे, ब्रम्हपुरी प्रतिनिधी✒
ब्रम्हपुरी,27 फेब्रुवारी:- तालुक्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. काल सोनूले रा मेंडकी येथील अपघाताची घटना ताजी असतांना परत आज रानबोथली याच गावात सकाळी 8 वाजता एक 4 वर्षाच्या चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोनूले रा मेंडकी येथील अपघाताची घटना ताजी असताना आज कार्तिक सुभाष देशमुख वय 4 वर्ष रा.लाडज या चिमुकल्याचा अपघातात मृत्यु झाला. कार्तिक हा आपल्या आई वडिलांसोबत सकाळी रानबोथली या गावात आपल्या आजोबांकडे आला. मृतकाचा मावसा फिर्यादी रेवनदास राऊत यांच्या मुला सोबत रस्त्यावर खेळत असतांना मेंडकी मार्गे ब्रम्हपुरी वरून चंद्रपुरला जाणाऱ्या इकोस्पोर्ट वाहन क्रमांक एम.एच 34 बी.एफ 0326 या वाहनाने धडक दिल्याने निरागस कार्तिकचा मृत्यू झाला. कालच्या व आजच्या अपघाताच्या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे निरिक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात अशोक मदाळे, अंमलदार विलास गेडाम आदी करत आहेत सदर घडलेल्या या घटनेमुळे रानबोथली या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here