Demand for joint office of Commissioner of Police for Chandrapur and Gadchiroli districts. Kishore Bhau Jorgewar
Demand for joint office of Commissioner of Police for Chandrapur and Gadchiroli districts. Kishore Bhau Jorgewar

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी संयुक्त रित्या पोलीस आयुक्त कार्यालय देण्याची मागणी आ. किशोर भाऊ जोरगेवार

चंद्रपुरातील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणी सह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला नवे पोलीस आयुक्तालयाची मागणी सुद्धा सभागृहात किशोर भाऊ जोरगेवार यांनी केली !

Demand for joint office of Commissioner of Police for Chandrapur and Gadchiroli districts. Kishore Bhau Jorgewar
Demand for joint office of Commissioner of Police for Chandrapur and Gadchiroli districts. Kishore Bhau Jorgewar

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- आज विधानसभा मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी वर चिंता व्यक्त करीत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी संयुक्त रित्या पोलीस आयुक्त कार्यालय देण्याची मागणी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्या कडे केली आहे. सोबतच पोलीस विभागातर्फे अहेरी येथे नक्षलवादी यांच्या शस्त्र साठ्यावर केलेल्या कारवाही बद्दल अभिनंदन सुद्धा केले. 2015 मध्ये जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी नंतर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी मध्ये वाढ झाली असून चंद्रपूर जिल्ह्याला अनेक राज्यांच्या सीमा लागतात त्यामुळे सुद्धा गुन्हेगारीचे प्रमाण इथे वाढले आहे तेव्हा चंद्रपूर च्या जनतेच्या रक्षणासाठी आणि कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्तालय हे चंद्रपूर ला मिळालेच पाहिजे! सोबतच चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या विविध उद्योगांमध्ये, कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगार बांधवांना रोजगार देण्याची मागणी सुद्धा मी आज सभागृहात केली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने नवा उपक्रम राबवित प्रत्येकाची स्थानिक असल्याची तपासणी करून घेण्यासाठी चंद्रपूर पोलीस विभागाला निर्देश देण्याची विनंती किशोर भाऊ जोरगेवार यांनी गृहमंत्री यांच्या कडे केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here