Home latest News लोहिया विद्यालयात सौंदड येथे जागतिक महिला दिन साजरा.

लोहिया विद्यालयात सौंदड येथे जागतिक महिला दिन साजरा.

76

लोहिया विद्यालयात सौंदड येथे जागतिक महिला दिन साजरा.

Lohia Vidyalaya celebrates International Women's Day at Saundad.

गोपाल अग्रवाल- तालुका प्रतिनिधी(सडक अर्जुनी)

सौंदड, दि. 8 मार्च:- रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथे दिनांक 8 मार्च 2021 ला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक-संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल यांनी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे, सहायक शिक्षिका-कु. पि. एस.भेंडारकर, शारीरिक शिक्षिका- यु.आर.बाच्छल, सहा. शिक्षक टी.बी.सातकर यांनी महिला दिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषणातून माहिती सांगितली कार्यक्रमाला विद्याथी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका- यु. बी. डोये यांनी केले तर आभार उ. मा. शिक्षक पी. एस. कापगते यांनी मानले.