बीडमध्ये आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या.

56

बीडमध्ये आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या.

In Beed, the younger brother killed the elder brother in front of his parents.

✒बीड जिल्हा प्रातिनिधि✒
बीड, 09 मार्च :- मध्ये आई आणी वडीला समोर लहान भावाने आपल्या स्वताःच्या मोठ्या भावाची हत्या केल्याची खळखळजनक घटना घडली आहे. शेख कुटुंबातील दोन भावांमध्ये प्लॉटचे भाडे घेण्यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर भांडणात झाले. या वादात लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या केली. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे घडली. मोठया भावाचा खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि स्वता:ला पोलिसांचा स्वाधीन केल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इर्शाद शेख शकील असं खून झालेल्या मोठया भावाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सख्खा भाऊ पक्का वैरी ठरला आहे. विशेष म्हणजे, सगळे भांडण होत असताना आई आणि वडील समोर होते. त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने ते अपयशी झाले.

मोठा भाऊ शेख इर्शाद शेख शकील मरण पावला आहे, हे लक्षात आल्यानंतर आरोपी हा स्वतः माजलगांंव ग्रामीणशेख हर्षद शेख शकील पोलीस ठाण्यात हजार झाला आणि घडलेला प्रकार सांगितला.