There was a love marriage six months ago, a violent quarrel between husband and wife, brutal murder of wife by husband.
There was a love marriage six months ago, a violent quarrel between husband and wife, brutal murder of wife by husband.

सहा महिन्यापुर्वी झाला प्रेमविवाह, नवरा बायकोत झाल कडाक्याचं भांडण, पतीकडून पत्नीचा निर्घृण हत्या.

कोरोनाच्या काळात सहा महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह.

There was a love marriage six months ago, a violent quarrel between husband and wife, brutal murder of wife by husband.
There was a love marriage six months ago, a violent quarrel between husband and wife, brutal murder of wife by husband.

दयानंद सावंत क्राईम प्रतीनिधी✒
अहमदनगर, दि,10 मार्च:- जिल्हातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नवरा बायकोचा भांडणात नव-याने बायकोची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने कर्जत तालुका तसंच मिरजगाव परिसर हादरला आहे. जागतिक महिला दिनीच्या दिवशीच पत्नीची हत्या झाल्याने तालुक्यातील महिलांच्यामध्ये संतापाची लाट आहे.

कोरोना वायरसच्या काळात प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर अवघ्या सहा महिने झालेले असताना पतीने पत्नीची निर्घृण हत्या केला आणि आत्महत्या केल्याचा बनाव केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघडकीस आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिली.

दि. 8 मार्च रोजी मिरजगाव येथील शंकर किशोर साळवे आणि पत्नी नेहा नवरा बायकोत दुपारच्या सुमारात कडाक्याचे भांडण झाले. यात किशोर याने नेहाला लाथाबुक्क्याने तसंच कमरेच्या पट्टयाने मारहाण करून भिंतीवर डोके आपटले होते. यावेळी त्या ठिकाणी नेहा यांची बहीण दिक्षा आणि लहान भाऊ तेथे हजर होते. बहीण दिक्षा हिने त्यांना समजावून सांगितले परंतु त्यांचे भांडण मिटत नसल्याने दिक्षा आणि लहान भाऊ हे आपल्या गावी निघाले होते.

भाऊ-बहीण वाटेत असताना किशोर साळवे याने त्यांना फोन करून सांगितले की, नेहा हिने गळफास घेऊन आत्महत्या घेतला. मी सध्या तिला घेऊन मिरजगावमधल्या दवाखान्यात घेऊन आलोय तुम्हीही या असे सांगितल्याने दिक्षा आणि लहान भाऊ मिरजगाव येथे आले. तोपर्यंत नेहाचा मृत्यू झाला होता.

कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिरजगाव दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन अहवालात वैद्यकीय प्रमाणपत्रात डोक्यास अंतर्गत मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद असल्याने मयताची बहीण दिक्षा ठोसर रा.नवसरी गुजरात यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी शंकर साळवे यास ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here