सिंदी रेल्वे येथे शेतक-यांच्या गोट्याला भीषण आग. 5 बैल जळुन खाक, लाखोंचे नुसकान.

56

सिंदी रेल्वे येथे शेतक-यांच्या गोट्याला भीषण आग. 5 बैल जळुन खाक, लाखोंचे नुसकान.

 A huge fire broke out in a group of farmers at Sindi Railway. 5 oxen burned to ashes, millions lost.

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतिनीधी✒
सिंदी रेल्वे, दि. 17 मार्च:- येथे शेतक-यांच्या गोठ्याला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे त्यात शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

प्राप्त माहितीनुसार सिंदी रेल्वे येथील प्रतिष्ठित शेतकरी मधुकर लिखार यांच्या मौजा मारडा शिवारातील शेतातील सहा बैलाच्या आणि 50 एकर शेती कसण्यासाठी लागणार्‍या साहित्य व गुरांचे वैरण ठेवता येईल ऐवढ्या मोठ्या गोठ्याला मंगळवारी ता. 16 रात्री 7 ते 8 वाजताचा दरम्यान अचानक भीषण आग लागली आगीने लवकरच भीषण रुप धारण केले. गोट्यात लागलेल्या आगीत सहा बैला पैकी पाच बैल जागीच कोळसा झाले तर पंचवीस तीस गोने हरभर्याचे कुटार सहा बैलाच्या वाहीतीसाठी लागणारे शेतीची अवजारे, दोर, दावे, जु, वखर, नागर, तिफन आदी असंख्य साहीत्य जळुन अशरक्षः खाक झाले. एक बैल दाव तोडुन पळाला म्हणून त्यांचा जीव वाचला मात्र आगीत सापडल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाला आहे.

 A huge fire broke out in a group of farmers at Sindi Railway. 5 oxen burned to ashes, millions lost.